Narendra Modi | Eknath Shinde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Shinde News: काँग्रेसच्या टीकेमध्ये PM मोदी लक्ष्य! एकनाथ शिंदेंच्या लागलंय जिव्हारी, नेमकं घडलंय तरी काय?

Eknath Shinde criticises Congress over PM Modi comments : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संतापले, म्हणाले, काँग्रेस खड्ड्यात जाणार हे नक्की!

Sampat Devgire

Congress Vs BJP News: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बाप काढत टीका केली, त्यामुळं भाजपचे नेते आक्रमक झाले आहेत. यामुळं देशभरात काँग्रेस विरुद्ध भाजप आरोपांची राळ उडाली आहे. पण दुसरीकडं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काँग्रेसच्या टीकेमुळं चांगलेच अस्वस्थ झाले आहेत. खर्गेंचा त्यांनी समाचार घेतला आहे, भाजपचा सहकारी पक्ष म्हणून शिंदे भाजपच्या मदतीला धावून आले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी बोलताना आई-वडिलांविषयी अपमानास्पद शब्दप्रयोग झाला, ही काँग्रेसची वैचारिक दिवाळखोरी आहे. पंतप्रधानांविषयी वारंवार अशा पद्धतीने टीका करून काँग्रेस स्वतःच खड्ड्यात जाण्याची व्यवस्था करत आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. १४० कोटी जनतेसाठी दिवस रात्र काम करणाऱ्या पंतप्रधानांना राजकीय विरोध होत असतो. मात्र, राजकीय विरोध करताना त्यांच्या कुटुंबीयांचा उल्लेख करणे, अपमान करणे योग्य नाही, अशी भूमिकाही त्यांनी मांडली आहे.

पंतप्रधानांची धोरणं आणि निर्णय तसंच कामकाजावर विरोधक टीका करतात. विरोधकांनी जरूर अशी टीका करावी. मात्र, वैयक्तिक आणि कौटुंबिक पातळीवर जाऊन अपमानास्पद भाषेचा वापर योग्य नाही. ही भारतीय संस्कृती नव्हे असं शिंदे यांनी म्हटलं आहे. नाशिकच्या दौऱ्यावर असलेले एकनाथ शिंदे या विषयावर चांगलेच आक्रमक झाले होते.

दरम्यान, राष्ट्रीय राजकारणात काँग्रेस अध्यक्ष यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली. हा राष्ट्रीय स्तरावर भाजप विरुद्ध काँग्रेस असा विषय आहे. मात्र, राज्याच्या राजकारणात कार्यरत असलेल्या एकनाथ शिंदेंना काँग्रेसची भाजपवरील टीका चांगलीच जिव्हारी लागल्याचं चित्र आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT