Nirmala Gavit Court Relief 2026 Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nirmala Gavit Politics: एकनाथ शिंदेंच्या नेत्याला मोठा दिलासा, माजी आमदार गावित यांच्या विरोधकांना न्यायालयाची चपराक!

Nirmala Gavit gets relief from court in February 2026: सिंचन योजनांच्या कामाविषयी दिल्लीपासून गल्लीपर्यंत माजी आमदार निर्मला गावित यांच्या विरोधकांनी सहा वर्षे पाडला होता तक्रारींचा पाऊस.

Sampat Devgire

Igatpuri Politics News 2026: शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या नेत्या माजी आमदार निर्मला गावित यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आदिवासी सिंचन योजना प्रकरणात ही घडामोड आहे. सहा वर्षे विविध स्तरावर गावित विरोधकांना मोठी चपराक बसली आहे.

माजी आमदार निर्मला गावित यांनी इगतपुरी तालुक्यात देव मोगरा संस्था स्थापन केली होती. या संस्थेच्या माध्यमातून शासनाच्या अनुदानातून आदिवासींना सिंचन सुविधा देण्यात आली. त्यामुळे तालुक्यातील अनेक आदिवासींच्या शेतीला पाणी मिळाले.

या आदिवासी सिंचन योजनांमुळे माजी आमदार गावित यांच्या विरोधकांनी त्याला अडथळे आणले होते. या संदर्भात काही राजकीय नेत्यांच्या पाठिंब्याने गोपाळ लहांमगे यांनी त्याला विरोध केला होता. माजी आमदार गावित यांच्या विरोधात दिल्लीच्या केंद्रीय तपास यंत्रणांकडे देखील तक्रारी झाल्या.

इगतपुरी- त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार निर्मला गावित यांच्या विरोधात सातत्याने राजकीय तक्रारींचा पाऊस पडला होता. धर्मदाय आयुक्त यापासून तर विविध यंत्रणांकडे या तक्रारी होत्या. यामध्ये सिंचन योजना राबविताना भ्रष्टाचार झाल्याची तक्रार होती.

या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात देखील तक्रार करण्यात आली होती. मात्र न्यायालयाच्या भूमिकेमुळे ही याचिका मागे घेण्यात आली. त्यानंतर थेट जिल्हा सत्र न्यायालयात तक्रार झाली होती. धर्मदाय आयुक्तांकडे देखील श्री लहांगे यांनी विविध तक्रारी केल्या होत्या.

गेली सहा वर्ष याबाबत विविध स्तरावर झालेल्या तक्रारींची सुनावणी सुरू होती. मार्च २०१९ मध्ये श्रीमती गावित विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर पहिली तक्रार दाखल करण्यात आली होती. श्रीमती गावित यांचे पती कार्यकारी अभियंता रमेश गावित आणि अन्य कुटुंबीयांनी विरोधात देखील या तक्रारी होत्या.

गावित विरोधकांनी विधानसभा निवडणुकीत देखील हा प्रचाराचा मुद्दा केला होता. मात्र गेली सहा वर्ष विविध स्तरावर चौकशा होऊन या आरोपांना कोणतीही पुष्टी मिळाली नाही. त्यामुळे याबाबतच्या सर्व तक्रारी आता फेटाळण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष नयना गावित यांसह माजी आमदार निर्मला गावित आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

इगतपुरी त्रंबकेश्वर मतदारसंघात श्रीमती गावित आणि त्यांच्या विरोधकांमध्ये जोरदार राजकीय संघर्ष होता. गावित विरोधकांनी त्यासाठी सिंचन योजनांचा आधार घेतला होता. गेली दहा वर्ष तालुक्याच्या राजकारणात गावित आणि त्यांचे विरोधक यांच्यात हाच मुद्दा प्रबळ ठरला होता. या तक्रारी फेटाळण्यात आल्याने आता गावित विरोधकांना मोठा धक्का बसला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT