Mayor Himguary Adke : हिमगौरी आडके यांची, 'पूजा पॉलिटिक्स स्टाईल'; कार्यभार घेताना मुख्यमंत्र्यांचीच कॉपी!

Nashik NMC Mayor Himgauri Adke will implement BJP Chief Minister Devendra Fadnavis' program-नवनिर्वाचीत भाजपच्या महापौर हिमगौरी आडके यांनी घेतला कार्यभार, आज महापालिकेचे कार्यालय आणि महापौर निवासस्थानी घातली पूजा
Mayor Himgauri Adke
Mayor Himgauri AdkeSarkarnama
Published on
Updated on

Nashik Mayor News: नाशिक महापालिकेत भाजपने पूर्ण बहुमत प्राप्त करीत सत्ता काबीज केली. पक्षाच्या हिमगौरी आडके या बिनविरोध महापौर झाल्या. आता त्यांनी कार्यभार स्विकारताच पुढील कामकाजाची दिशा स्पष्ट केली आहे.

भाजपच्या हिमगौरी आडके यांनी आज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यभार स्वीकारला. तत्पूर्वी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पक्षाच्या कार्यालयात त्यांचा सत्कार झाला होता. त्यांनी आज महपालिकेतील कार्यालय आणि महापौर निवासस्थानी साग्र संगीत पूजा केली. त्यासाठी विविध पुरोहितांना निमंत्रित करण्यात आले होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारल्यावर शंभर दिवसांचा कार्यक्रम जाहीर केला होता. महापौर अडके यांनीही तोच कित्ता गिरविण्याचा निर्धार केला. यासंदर्भात लवकरच शंभर दिवसांचे टार्गेट घेऊन काम करेल, असे त्या म्हणाल्या.

Mayor Himgauri Adke
Eknath Shinde Politics: उपमहापौरपदावरून मोठा गेम! तिदमे बाहेर, नाशिक शिंदेसेनेत ‘इनसाईड पॉलिटिक्स’चा स्फोट

महापौर आडके यांनी पदभार स्वीकारल्यावर शहराच्या प्रथम नागरिक म्हणून आगामी कामकाजाची दिशा स्पष्ट केली. यावेळी त्यांनी प्रशासन, नागरिक आणि भाजपसह सर्वांचेच सहकार्य घेणार असल्याचे सांगितले. शहरासाठी काम करून दाखविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

Mayor Himgauri Adke
Raj Thackeray Politics: राजकीय दोलायमान मनसे! ठाकरेंवर विसंबलेली, पण शिंदेंना दाद दिली अन् अस्तित्वच...!

नाशिक शहरात आगामी सिंहस्थ कुंभमेळा हा सर्वात महत्त्वाचा उपक्रम आहे. महापालिकेचे त्यामध्ये मोठे योगदान असे. त्यादृष्टीने सिंहस्थ च्या कामांचा नियमितपणे आढावा घेतला जाईल. हा सर्वात महत्त्वाकांक्षी उपक्रम असेल. यशस्वी करून दाखवू, असे त्या म्हणाल्या.नाशिक शहरातील नागरिकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. सिंहस्थ साठी मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यामुळे अनेक मार्ग आणि वाहतूक वळविण्यात आली आहे. त्याचा नागरिकांना किमान त्रास व्हावा, असा आमचा प्रयत्न असेल. त्यासाठी या कामांचा आढावा घेऊ.

शहरातील रस्ते आणि खड्डे ही मोठी समस्या आहे. नागरिकांनी त्याबाबत सातत्याने तक्रारी केले. त्यामुळे शहरातील रस्ते चांगल्या दर्जाचे व्हावेत. खड्डेमुक्त रस्ते याला आपले प्राधान्य असेल, असेही महापौरांनी कार्यभार स्वीकारल्यावर सांगितले.

भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने महापालिकेत एकत्र येऊन सत्ता स्थापन केली आहे. त्यांच्याकडे बहुमतापेक्षा कितीतरी अधिक संख्याबळ आहे. या पार्श्वभूमीवर आज महापौरानी कामाला सुरुवात केली. शिवसेना शिंदे पक्षात मात्र उपमहापौर पदावरून नगरसेवक व पदाधिकाऱ्यांतच आरोप, प्रत्यारोप सुरू आहेत.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com