Maharashtra sugar mills notice latest update Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Operation Tiger Politics: मंत्री संजय शिरसाट ऑपरेशन टायगर बाबत सुचक बोलले, म्हणाले, "तेव्हा खेळ खल्लास!"

Sanjay Shirsat statement on Operation Tiger politics: मंत्री संजय शिरसाट म्हणतात, एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना सांगून थोडेच ऑपरेशन करणार आहे, मात्र ऑपरेशन टायगर होणार हे नक्की.

Sampat Devgire

Operation Tiger in Maharashtra politics: गेले काही दिवस शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष पुन्हा चर्चेत आला आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार फोडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षानेही दुजोरा दिला आहे. त्यामुळे मोठ्या पडद्याआड मोठ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात पुन्हा एकदा फूट पाडण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रसद तयार ठेवली आहे. आठ खासदार लवकरच शिंदे गटात दाखल होतील, असा दावा केला जातो. राष्ट्रीय राजकारणात आपला प्रभाव वाढविण्यासाठी शिंदे यांनी हे डावपेच आखले आहेत.

गेले तीन महिने याबाबत चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी दोन वेळा दिल्ली दौरा केला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे पक्षाच्या काही खासदारांची संपर्क केल्याचे बोलले जाते. या खासदारांना मधाचे बोट लावत मोठे आश्वासन दिल्याची चर्चा आहे.

या पार्श्वभूमीवर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी सूचक विधान केले आहे. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाकडे उद्धव ठाकरे यांच्या अनेक लोकप्रतिनिधींचा ओढा आहे. त्याबाबत जाहीरपणे बोलायचे नसते हे राजकीय संकेत आहेत.

शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष ऑपरेशन टायगर निश्चितपणे राबवणार आहे. मात्र हे करताना सांगून करण्यात येणार नाही. त्यादिवशी ठरेल, त्यादिवशी उद्धव ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसेल. त्यादिवशी त्यांचा खेळ संपलेला असेल, असे ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून गेले काही दिवस उद्धव ठाकरे यांच्या खासदारांमध्ये फूट पाडण्यासाठी जोरदार डावपेच आखले जात आहेत. काही खासदार त्यांच्या गळ्याला लागले आहेत. मात्र पक्षांतर बंदी कायद्यातील तरतुदीनुसार अपेक्षित संख्या जमत नसल्याने हे प्रत्यक्षात घडू शकले नव्हते, असे कळते.

या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष देखील सावध झाला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याबाबत दोन वेळा खासदारांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी खासदारांच्या समस्या ऐकल्या. पक्षातील फुटीबाबत त्यांनी कठोर भूमिका घेतली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या प्रलोभनांना उद्धव ठाकरे पक्षाचे किती खासदार बळी पडतात? याची चर्चा सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT