Omraje Nimbalkar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Omraje Nimbalkar: पैसे घेऊन मतदान? मग देवच वाचवणार! मत खरेदीवर ओमराजे निंबाळकरांचा प्रहार

Nashik Shiv Sena Uddhav Thackeray MP Omraje Nimbalkar's strong opinion on the use of money in elections-निवडणुकीतील गैरप्रकारांवर ओमराजे निंबाळकर यांनी व्यवस्थेला जबाबदार धरले

Sampat Devgire

Vote for Money News: शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयातर्फे कार्यक्षम खासदार पुरस्कार देण्यात आला. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर उपस्थित होते. यानिमित्ताने निवडणुकीतील गैरप्रकारांवर चर्चा झाली.  

राज्यातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा कार्यक्षम खासदार पुरस्कार शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे ओमराजे निंबाळकर यांना देण्यात आला. यावेळी ओमराजे निंबाळकर यांनी त्यांचा राजकारणातील प्रवेश आणि वाटचाल याविषयी मनमोकळ्या गप्पा मारल्या. निवडणुकीतील गैरप्रकारांबाबत नाराजी व्यक्त केली.

कोणत्याही निवडणुकीत सध्या पैशाचा वारे माप वापर केला जातो. मोठ्या प्रमाणावर पैसे वाटपाचा आरोप केला जातो. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करताना दिसतात, असे शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सांगितले.

यावर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी संताप व्यक्त केला. सध्याचे राजकारण दिवसेंदिवस गढूळ होत चालले आहे. पैसे घेऊन मतदान करणाऱ्या लोकांना परमेश्वरच वाचवू शकतो, असे विधान त्यांनी केले. हे प्रकार थांबविण्यासाठी यंत्रणेने गैरप्रकारांकडे डोळेझाक करणे बंद करावे.

ते म्हणाले पैशाच्या जोरावर निवडून आलेले लोकप्रतिनिधी कधीही जनतेसाठी काम करीत नाहीत. ते निवडणुकीत झालेला खर्च वसूल करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात. अशा उमेदवारांना निवडून देण्यात शेवटी जनतेचे नुकसान होते, हे लक्षात ठेवावे. 

सध्या समाज माध्यमांचा वावर आणि वापर वाढत आहे. त्याचा फटका काही चांगल्या लोकांनाही बसतो. काहीही केले तरी राजकारण्यांवर टीका होते. या टीके कडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मात्र कोणत्याही स्थितीत टीका होते म्हणून चांगले काम करणे थांबवू नये, असे मत त्यांनी व्यक्त केले. 

आपण ठरवून राजकारणात आलेलो नाही. वडील पवनराजे निंबाळकर यांची हत्या २००६ मध्ये झाली. त्यानंतर लोकांच्या दबावातून मी राजकारणात आलो. चांगले काम करीत राहिलो. लोकांच्या अडचणीत त्यांच्या मदतीला धावलो. त्यामुळे लोकांनी माझा स्वीकार केला. एवढ्या कमी वयात मी आमदार झालो की त्यावर माझा देखील विश्वास बसत नव्हता. 

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT