PMC Election: पुणे महापालिका निवडणुकीत पैशांचे वाटप! शिवसेना आक्रमक, नीलम गोऱ्हेंनी दिला इशारा, म्हणाल्या...

Pune Municipal Election : पुणे महापालिका निवडणुकीत पैशांचे वाटप होत असल्याचा आरोप करत शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी प्रशासन व निवडणूक आयोगाला कठोर कारवाईचा थेट इशारा दिला.
Shiv Sena leader and Deputy Chairperson of the Legislative Council Dr. Neelam Gorhe addressing a press conference in Pune over alleged money distribution in municipal elections.
Shiv Sena leader and Deputy Chairperson of the Legislative Council Dr. Neelam Gorhe addressing a press conference in Pune over alleged money distribution in municipal elections.Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन निवडणूक प्रक्रियेतील गंभीर अनियमितेवर सडकून टीका केली आहे.

मागील निवडणुकीत पैसे वाटप झालेल्या भागांतील अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असल्या तरी त्यांचे 'उद्योग' दुसऱ्या ठिकाणी सुरूच असल्याचा आरोप त्यांनी केला असून राज्य निवडणूक आयोगाने याबाबत लक्ष घालून तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

"गेल्या सहा महिन्यांत बदली झालेल्या अधिकाऱ्यांचे रेकॉर्ड तपासावे. मतदान केंद्रांवर पूर्ण पारदर्शक प्रक्रिया राबवावी. पैसे वाटून निवडणूका जिंकता येत नाहीत; येत असत्या तर काँग्रेस कधीच हरली नसती," असे गोऱ्हे म्हणाल्या. पैसे वाटपाबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Shiv Sena leader and Deputy Chairperson of the Legislative Council Dr. Neelam Gorhe addressing a press conference in Pune over alleged money distribution in municipal elections.
Mahapalika Election Campaign: जाहीर प्रचार थांबला, तरीही मतदानापर्यंत 'प्रचार' सुरुच राहणार! आयुक्तांच्या उत्तरानं वाढला गोंधळ; राज्यात खळबळ

पोलीस आणि प्रशासनावर दबावाचा आरोप

निवडणुकीदरम्यान मोक्याच्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असून, पोलिसांनी दबावाला बळी न पडता गस्त कठोर करावी, अन्यथा संघर्ष वाढण्याची शक्यता असल्याचा इशारा डॉ. गोऱ्हे यांनी दिला. मतदारांना मतपत्रिका देताना प्रक्रिया स्पष्ट समजावून सांगावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी निवडणूक आयोगाला केले.

कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न

निवडणुकीदरम्यान अटीतटीचे राजकारण, दबाव आणि पैसे वाटपाचे प्रकार घडत असून, राजकीय पक्षांनी कायदा-सुव्यवस्थेवर आग्रही भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा यावेळी बोलताना डॉ. गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी व्यक्त केली.

Shiv Sena leader and Deputy Chairperson of the Legislative Council Dr. Neelam Gorhe addressing a press conference in Pune over alleged money distribution in municipal elections.
Pune ZP Election : अजितदादांना पुणे जिल्ह्यात उघडपणे नडलेल्या नेत्याचा भाजपप्रवेश ठरला : जिल्हा परिषदेत 'ऑपरेशन लोटस'ला बळ

शिवसेनेने (Shivsena) यंदा आरोप-प्रत्यारोप टाळून फक्त विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. पुण्याला समाजसुधारकांचा वारसा आहे; पुणेरी संस्कृती टिकवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत, असे गोऱ्हे म्हणाल्या. शहराची 'ब्ल्यू प्रिंट' तयार असून, मनपात यश मिळाल्यास पर्यटनाला चालना, शाळा-सुविधा, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि समाविष्ट गावांतील दुहेरी कराचा प्रश्न सोडवण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com