Nashik Simhastha land expansion protest Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Simhastha land expansion protest : साधुग्रामला इंच वाढीव जागा देणार नाही; सरकारचं 1200 एकर जमीन आरक्षित करण्याचं धोरण, आता शेतकरी कृती समिती आक्रमक

Nashik Simhastha Kumbh Mela 1200-Acre Expansion Policy Opposed by Farmers Action Committee : कुंभमेळ्यासाठी अधिक वाढ करत सुमारे 1200 एकर हून अधिक जागा आरक्षित करून कुंभमेळ्याचा विस्तार करण्याचा निर्णय सरकार घेत आहे.

Pradeep Pendhare

Nashik Simhastha Kumbh Mela : नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवनात साधुग्राम उभारण्यासाठी प्रस्तावित वृक्षतोडीला विरोध झाल्यानंतर आता पाठोपाठ साडे तीनशे एकर पेक्षा अधिक म्हणजे एक इंच जागा देण्यास विरोध केला आहे.

शेतकरी कृती समितीची मंगळवारी बैठक झाली त्यात विरोध करण्यात आला.

नाशिक (Nashik) सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवन परिसरातील 350 एकर जागेवर महापालिका व सरकारवतीने आरक्षण टाकण्यात आले आहे. यामध्ये अधिक वाढ करत सुमारे 1200 एकर हून अधिक जागा आरक्षित करून कुंभमेळ्याचा विस्तार करण्याचा निर्णय सरकार घेत आहे. या निर्णयाला शेतकरी कृती समितीने विरोध दर्शविला. तपोवनातील आरक्षित 350 एकराहून अधिक इंचही जमीन कुंभमेळ्यासाठी देणार नाही, असा निर्णय शेतकरी कृती समितीच्या वतीने घेण्यात आला आहे.

शेतकरी (Farmer) कृती समितीची बैठक जेजुरकर मळा येथे पार पडली. बैठकीस कृती समितीचे समाधान जेजुरकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. सन 2004 साली 105 एकर क्षेत्रावर कुंभमेळा पार पडल्यानंतर महापालिकेच्या वतीने तपोवन परिसरातील 350 एकर जागेवर आरक्षण टाकले. आता पुन्हा एकदा यामध्ये वाढ करून 1200 एकर जागा आरक्षित करून कुंभमेळा करण्याचे नियोजन केले जात आहे. या सर्व प्रक्रियेला शेतकऱ्यांचा पूर्णपणे विरोध आहे.

शेतकरी कुठल्याही प्रकारचे भूसंपादन, भाडेतत्वावर किंवा आरक्षित होऊ देणार नाही. शासनाने आरक्षित आहेत त्याच जागेवर कुंभमेळा करावा. अन्यथा शेतकरी कृती समिती शासनाच्या या निर्णयाच्या विरोधात तीव्र स्वरुपात आंदोलन छेडेल असा इशाराही कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे.

दरम्यान 1200 एकर जागेत भुसंपादन होणार असल्याने नाशिक उपविभागीय कार्यालयाच्यावतीने थेट नांदूरपर्यंत भाडे तत्वावर जागा घेण्याच्या नोटीसा शेतकऱ्यांना बजावण्यात आल्या आहेत. मागील तीन वर्षातील जमिनीचा पिकपेरा, सातबारा उतारा शेतकऱ्यांकडून मागण्यात आला. सदरची जागा तात्पुरत्या स्वरुपात भाडे तत्वावर घेणार असल्याचे कारण सांगितले जात असले, तरी स्थानिक शेतकरी मात्र कायमस्वरुपी आरक्षणामुळे धास्तावले आहेत.

बिल्डर्सकडून देखील कायमस्वरुपी आरक्षण टाकले जाणार असल्याने, त्यामुळेचं जागांवर रेखांकन करण्यात आल्याचे सांगितले जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये गोंधळ आहे. विशेष म्हणजे, सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण, महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालयातील भुसंपादन विभागातील अधिकायांकडून कुठलेचं स्पष्टीकरण न देता नोटीसा पाठविल्या जात असल्याने गोंधळाची स्थिती स्थानिक शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT