Nashik Talathi Protest : नाशिक जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तुळात सध्या खळबळ उडाली आहे. त्याला कारणही तसच आहे. एका प्रातांधिकाऱ्याविरोधात जिल्ह्यातील जवळपास 800 तलाठी आणि ग्रामविकास अधिकारी एकवटले असून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे.
फेरफार नोंदी आणि महसूल कामकाजात अनियमितता असल्याचे तपासणीत उघड झाल्यानंतर सहाय्यक जिल्हाधिकारी तथा इगतपूरीचे प्रांताधिकारी पवन दत्ता यांनी इगतपुरी तालुक्यातील एक मंडलाधिकारी व पाच तलाठ्यांवर निलंबनाची कारवाई केली होती. वेतनवाढही रोखली होती. या कारवाईविरोधात तलाठ्यांनी मिळून पवन दत्ता यांच्याविरोधात एल्गार पुकारला असून निलंबन मागे घेण्याची मागणी केली आहे.
निलंबनाची कारवाई करणाऱ्या तलाठी तसेच मंडलाधिकाऱ्याला कारवाईपूर्वी कोणत्याही प्रकारची नोटीस देण्यात आली नाही. खुलासा न मागवताच कारवाई केल्याने ती बेकायदेशीर असल्याचे तलाठी संघाचे म्हणणे आहे.
प्रांत अधिकारी पवन दत्ता यांचा मनमानी कारभार सुरु असल्याचा आरोप तलाठी महासंघाने केला आहे. प्रांताधिकार्यांनी बेकादेशीर निलंबन केल्याचा आरोप तलाठी महासंघाने केला आहे. मंडलाधिकारी व तलाठ्यांवरील निलंबन मागे घेण्यासह इतर मागण्या मान्य कराव्या अशी मागणी आंदोलनातून करण्यात आली आहे.
प्रशासकीय सेवेतील आपल्या विविध मागण्यांसाठी 15 तालुक्यातील ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांनी एकत्र येत आंदोलनात सहभाग नोंदवला आहे. विशेष म्हणजे, प्रांताधिकाऱ्यांविरुद्ध जवळपास 800 तलाठी व ग्रामविकास अधिकारी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला बसले आहेत. दरम्यान मागण्या मान्य न झाल्यास बुधवार पासून कामबंद आंदोलन केलं जाईल असा इशाराही तलाठी महासंघाने दिला आहे.
प्रशासनातील काही अधिकाऱ्यांच्या कडक शिस्तीचा आणि कठोर कार्यपद्धतीचा अनुभव कर्मचाऱ्यांना अनेकदा येतो. मात्र, ग्रामस्थ आणि सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींमुळे नेहमीच टीकेच्या केंद्रस्थानी असणाऱ्या ग्रामविकास अधिकारी आणि तलाठ्यांनाही आता एका खमक्या अधिकाऱ्याच्या कडक कारवाईला सामोरे जावे लागल्याचं पाहायला मिळत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.