Nashik News : नाशिक महापालिका नगररचना विभाग आणि म्हाडा यांच्या संयुक्तपणे आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव 20 टक्के सदनिकांमध्ये मोठा घोटाळा झाला होता. यात आतापर्यंत यामध्ये दोन मोठ्या बिल्डरांसह महापालिका आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली आहे.
विधिमंडळात गाजलेल्या या प्रकरणाची चौकशीची प्रक्रिया सुरू आहे. बांधकाम व्यावसायिकांनी याबाबत मुंबई उच्च न्यायालयासह अन्य ठिकाणी दाद मागितली आहे. अशा परिस्थितीत महसूल आयुक्तांनी मोठा निर्णय घेतला आहे.
९०० कोटी रुपयांच्या या घोटाळ्यात बांधकाम व्यवसायिक, महापालिका आणि महसूल विभागाच्या संयुक्त घोटाळ्यात शासकीय रेकॉर्डमध्ये संगणमताने फेरबदल करण्यात आले. घोटाळ्यात एकाच वेळी नगर रचना उपायुक्तांपासून ते तलाठ्यांपर्यंत कर्मचाऱ्यांची साखळी गुंतलेली आहे.
महसूल आयुक्तांनी या प्रकरणात नाशिक येथील तलाठी अनिल रोकडे, मनीषा पाटील, नितीन चितळकर आणि सागर शेलार या चार तलाठ्यांना निलंबित केले. तलाठ्यांनी नियमबाह्य पद्धतीने जमिनीची तुकडे बंदी करून रेकॉर्डमध्ये फेरफार केला होता. याद्वारे बांधकाम व्यवसायिकांना लाभ पोहोचविला. त्यांना आता घरचा रस्ता दाखविण्यात आला आहे.
विभागीय आयुक्तांच्या चौकशीत तलाठी मनीषा पाटील यांच्याशी संबंधित 16 केसेस आढळले आहेत. बिल्डर लॉबीला लाभ पोहोचविण्यासाठी बेकायदेशीरपणे रेकॉर्ड मध्ये फेरफार करण्यात आला. त्यात अन्य अधिकाऱ्यांचा समावेश आहे काय याची तपासणी सुरू आहे. या निर्णयाने महापालिका आणि महसूल यंत्रणेला मोठा धक्का बसला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.