Nashik TCS conversion Case Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Crime News : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपींचा पाय खोलात, ॲट्रॉसिटी’चे कलम वाढले...

Nashik TCS Case : नाशिकमधील TCS कंपनीत मुस्लीम धर्मातील संशयितांकडून हिंदू कर्मचारी महिला व मुलींचे लैगिंक शोषण व धर्मातर करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकरण देशभरात चर्चेत आहे.

Ganesh Sonawane

Nashik TCS conversion case : नाशिकमधील TCS कंपनीत घडलेल्या महिला लैगिंक शोषण व धर्मांतर प्रकरणात आता नवीन अपडेट समोर आली आहे. याप्रकरणातील एका गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींविरोधात ॲट्रॉसिटीचे कलमही लागू करण्यात आले आहे. त्यामुळे संशयितांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात संशयितांनी पीडितेला जातीवाचक शेरेबाजी व शिवीगाळ केल्याचा प्रकार SIT च्या तपासातून समोर आला आहे. त्यामुळे या गुन्ह्यात ॲट्रॉसिटीन्वये वाढीव कलम संशयितांविरोधात लावण्यात आले आहे.

दरम्यान, लैंगिक शोषण प्रकरणातील संशयित रझा रफीक मेमन (वय ३५, रा. हरिआनंद सोसायटी, सह्याद्री हॉस्पिटलजवळ, नाशिक), शफी भिकन शेख (३६, रा. तौरा पार्क, इंदिरानगर) या दोन संशयितांच्या मोबाईलमधील आक्षेपार्ह चॅटिंग’ तांत्रिक विश्लेषणातून SIT पथकाच्या हाती लागले आहे. या आक्षेपार्ह चॅटिंगसंदर्भातील सखोल चौकशीसाठी दोघाही संशयितांच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

याप्रकरणी आतापर्यंत पोलिसांकडून सात जणांना अटक करण्यात आली आहे. यात कंपनीची पुण्यातील एचआर हेड अश्विनी चैनानी हिचाही समावेश आहे. तसेच कंपनीची प्रोसेस असोशिएट निदा खान ही गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहे. तपास यंत्रणांची तब्बल पाच पथके तिच्या मागावर आहेत. निदा खानच्या पतीला ‘एसआयटी’ने मुंब्रा येथून चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

दरम्यान निदा खान हिने आता आपण गरोदर असल्याचा दावा आपल्या वकिलामार्फत केला आहे. तीने अटकपूर्व जामिनासाठी नाशिक रोड न्यायालयात अर्ज केला आहे. त्यात निदा हिने गर्भवती असल्याचे मुंब्रातील डॉक्टरांचे प्रमाणपत्र जोडले. या अटकपूर्व जामिनावर सोमवारी सुनावणी होणार आहे.

या प्रकरणाची सखोल माहिती घेण्यासह त्यातील सर्व तथ्य शोधण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाची ३ सदस्यीय समिती शनिवारी नाशिकमध्ये दाखल झाली. पहिल्याच दिवशी या प्रकरणातील एका पीडित महिलेसह तिच्या कुटुंबियांशी डिजिटल माध्यमांद्वारे समितीने संवाद साधला. ही समिती २० एप्रिलपर्यंत नाशिकमध्ये थांबून यातील पीडितेसह या प्रकरणातील संबधितांशीही थेट संवाद साधण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT