Nashik Crime : नाशिक पुन्हा हादरलं! शिंदेंच्या नेत्यावर टोळक्याचा जीवघेणा हल्ला, कार्यालयाबाहेरच कोयत्याने सपासप वार केले अन्...

Nashik on Shivsena Leader Suyash Patil : नाशिकमधील या धक्कादायक घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मात्र, या घटनेमुळे पुन्हा एकदा नाशिकमधील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तर हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाल्याचं बोललं जात आहे.
Eknath Shinde
A shocking scene from Nashik CIDCO where Shiv Sena leader Suyash Patil was attacked by a group with sharp weapons, highlighting rising crime concerns.Sarkarnama
Published on
Updated on

Nashik News, 15 Apr : नाशिक शहरातील सिडको परिसरात सोमवारी (ता.१३) रात्री उशिरा शिंदेंच्या शिवसेनेचे विभागप्रमुख सुयश पाटील यांच्यावर 6 ते 7 जणांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

हल्लेखोरांनी पाटील यांच्यावर कोयत्याने सपासप वार केल्याचा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या भीषण हल्ल्यात सुयश पाटील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून या प्रकरणाचा पुढील तपास नाशिक पोलिसांकडून सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमधील सिडको येथील दत्त चौक परिसरात सुयश पाटील असताना त्याचवेळी अचानक आलेल्या 6 ते 7 जणांनी पाटील यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले. हल्ल्यानंतर या टोळक्याने पाटील यांच्या कार्यालयाचीही तोडफोड केली आणि तिथून पळ काढला.

Eknath Shinde
Prakash Ambedkar : 'समाज जयंतीमध्ये मग्न असताना सरकारचा आरक्षण संपवण्याचा डाव...'; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, म्हणाले, "खदखद बाहेर पडू शकते"

या सर्व घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मात्र, या घटनेमुळे पुन्हा एकदा नाशिकमधील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तर हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाल्याचं बोललं जात आहे.

Eknath Shinde
Trimbakeshwar Darshan Pass Scam: त्रंबकेश्वर दर्शन पास घोटाळा! कडलक अटकेनंतर राजकारण तापलं! भाजप विरुद्ध राष्ट्रवादी संघर्ष तीव्र

दरम्यान, सुयश पाटील यांच्यावरील प्राणघातक हल्ल्या प्रकरणी नाशिकमधील अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पाटील यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com