Nashik News: राज्यभर चर्चेत असलेल्या टीसीएस धर्मांतरण प्रकरण पोलिसांनी गांभीर्याने घेतले. यासंदर्भात शुक्रवारी सरकारी वकिलांनी कठोर भूमिका घेतली. त्यामुळे आरोपींच्या अडचणी कायम आहेत.
नाशिकच्या टीसीएस धर्मांतरण प्रकरणात शुक्रवारी (ता.15) न्यायालयात सुनावणी झाली. आरोपींच्या वकिलांनी यावेळी जामिनासाठी आटोकाट प्रयत्न केले. मात्र, सरकारी वकिलांच्या विरोधामुळे त्यांना यश आले नाही.
नाशिकच्या टीसीएस या बहुराष्ट्रीय कंपनीतील कथीत अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, त्यावर पोलिसांनी गंभीर आक्षेप आणि हरकत नोंदवली.
सध्या नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात यातील पाचही आरोपी आहेत. अश्विन चेनानी, रजा मेनन, आसिफ अन्सारी, शाहरुख कुरेशी आणि तौसीफ आता यांचे जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळले. त्यामुळे या आरोपींच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. यांचा नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातील मुक्काम वाढला.
या प्रकरणातील प्रमुख संशयित निदा खान हिला सत्र न्यायालय तसेच उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अपूर्व जामीन फेटाळला होता. ती सध्या पोलीस कोठडीत आहे. देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात युवतींवरील अत्याचार आणि धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यात या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
संशयित निदा खान ही गेले दीड महिना पोलिसांना गुंगरा देत होती. तिला औरंगाबादच्या एमआयएम पक्षाचे नगरसेवक मतीन पटेल यांनी संरक्षण दिले होते. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर महापालिकेने दोन दिवसांपूर्वी कारवाई करून त्यांचे घर पाडले होते.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन महिला व बालकल्याण मंत्रालयाने काल याबाबत स्वतंत्र परिपत्रक काढले आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्येक खाजगी कंपनीत महिला अत्याचार प्रकरणी समिती कार्यरत असल्याची खातरजमा करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
आयटी कंपन्यांमध्ये यापूर्वीही पोर्श समिती महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारींबाबत कार्यरत होत्या. असे असूनही टीसीएस कंपनीत धार्मिक अत्याचाराचे प्रकरण घडले होते. कारण सध्या देशभर चर्चेत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.