NEET Paper Leak Case: 'नीट' पेपरफुटी प्रकरणात लातूरमधून सर्वात मोठी अपडेट, 'मास्टरमाईंड'ला अखेर अटक; प्राध्यापक पी.व्ही कुलकर्णीनं फोडला पेपर

Neet Exam News: देशभरात खळबळ उडवून दिलेल्या नीट पेपरफुटीच्या प्रकरणात आतापर्यंत अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. तसेच या प्रकरणात अनेक बड्या माशांना आत्तापर्यंत पोलिसांनी अटक केली आहे. पण अद्यापही मूख्य सूत्रधाराला अटक न झाल्यानं टीकेची झोड उठवण्यात येत होती.
Neet paper leak
Neet paper leaksarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी नीट परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक असतं. यावेळी 3 मे ला देशभरात ही परीक्षा घेण्यात आली होती. परंतु, या परीक्षेत पेपरफुटी झाल्याची धक्कादायक बाब समोर आली. या गंभीर प्रकारानंतर संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली आहे. ही परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या NEET परीक्षा कथित पेपरफुटी प्रकरणात सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे.

नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणातला मुख्य सूत्रधाराला पोलिसांनी अटक केली आहे. लातूर येथील प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णीला या पेपरफुटी प्रकरणी अटक केली आहे. सीबीआयनं या पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई करतानाच मास्टरमाईंड पी व्ही कुलकर्णीला लातूरमधून अटक केली आहे. त्याचा एनटीएशी संबंध असल्याचं समोर येत आहे.

देशभरात खळबळ उडवून दिलेल्या नीट पेपरफुटीच्या प्रकरणात आतापर्यंत अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. तसेच या प्रकरणात अनेक बड्या माशांना आत्तापर्यंत पोलिसांनी अटक केली आहे. पण अद्यापही मूख्य सूत्रधाराला अटक न झाल्यानं टीकेची झोड उठवण्यात येत होती. मात्र,सीबीआयला आता मास्टरमाईंड पी.व्ही.कुलकर्णीला अटक करण्यात मोठं यश आलं आहे.

यापूर्वी नीट पेपर फुटीप्रकरणी सीबीआयने आतापर्यंत देशभरातून विविध ठिकाणाहून 6 आरोपींना ताब्यात घेतलं आहे. तसेच विविध ठिकाणी धाडसत्र सुरू आहे. त्यात जयपूरमधून तीन,गुरुग्राममधून एक,नाशिक आणि अहिल्यानगरमधून एक अशा एकूण सहा आरोपींना अटक केली आहे. याचसोबत इतर अनेक संशयितांची कसून चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

Neet paper leak
Pune Bomb News: यूट्यूबवर व्हिडीओ पाहून 400 रुपयांत बनवला बॉम्ब अन् आरोपीनं आखला हादरवणारा प्लॅन, CP अमितेश कुमारांनी सगळी 'कुंडली'च काढली

नाशिकमधून शुभम खैरनार, अहिल्यानगरहून धनंजय लोखंडे ,जयपूरमधून मांगीलाल बिवाल, विकास बिवाल आणि दिनेश बिवाल तर गुरुग्राममधून यश यादव अशा एकूण 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

तसेच पुण्यातून ब्युटी पार्लर चालवणाऱ्या मनीषा वाघमारेचंही या पेपरफुटी प्रकरणात नाव समोर आलं होतं. पी.व्ही. कुलकर्णी हा वाघमारेच्या संपर्कात असल्याचंही तपासात समोर आलं आहे. कुलकर्णीला प्रत्येक विद्यार्थ्यामागं पैसे मिळत असल्याची धक्कादायक बाबही उघडकीस आली आहे.

Neet paper leak
Bulldozer Pattern : कंगना रानौतपासून मतीन पटेलपर्यंत अनेकांना 'बुलडोझर'चा दणका : टायमिंग अन् टार्गेटमुळे योगींचा 'पॅटर्न' वाढवतोय महाराष्ट्राची चिंता

नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयला लातूरमधून काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले होते. यानंतर तपासयंत्रणांकडून कसून चौकशी करण्यात आल्यानंतर केमिस्ट्रीचा प्राध्यापक असलेल्या पी व्ही कुलकर्णी या मास्टरमाईंडला ताब्यात घेतलं आहे.

याबाबत आणखी एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. चार वर्षांपूर्वीच कुलकर्णी हा सेवानिवृत्त असल्याचं समोर येत आहे.त्याच्या लातूरमधील कैलासनगर परिसरात असलेल्या घर बंद असून त्याचं कुटुंब पुण्यात राहत असल्याची माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com