Sanjay Raut, Eknath Shinde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sanjay Raut : 'स्ट्राइक रेट'वरुन राऊतांची मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका; म्हणाले, ते जिथे जातात तिथे...

Sanjay Raut On Eknath Shinde About Nashik Teachers Constituency : "मुख्यमंत्री शिंदे शनिवारी नाशिकला येऊन गेले. त्यांचा हा दौरा कशासाठी होता आणि ते प्रत्येक मतदारसंघात कशासाठी जातात हे सगळ्यांना माहिती आहे."

Sampat Devgire

Nashik News, 23 June : शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. लोकसभा निवडणुकीतील 'स्ट्राइक रेट'बद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.

शिक्षक मतदारसंघाच्या प्रचारासाठी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नाशिकला आले होते. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचा स्ट्राइक रेट आणि मते सर्वाधिक असल्याचा दावा केला होता.

शिंदेंच्या या दाव्याची पोलखोल खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली. ते म्हणाले, "मुख्यमंत्री जिथे जातात तिथे शेअर बाजाराप्रमाणे निवडणुकीचे बाजारही वाढतात. हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतील त्यांचा स्ट्राइक रेट हा बेईमानीचा आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी पैशांनी स्ट्राइक रेट विकत घेतला. मुंबईची जागा अक्षरशा लुटली. त्यांचा निकाल हा थैल्या आणि खोक्यांचा स्ट्राईक रेट आहे. हे महाराष्ट्रातील जनता चांगलीच ओळखून आहे."

मुख्यमंत्री शिंदे शनिवारी नाशिकला (Nashik) येऊन गेले. त्यांचा हा दौरा कशासाठी होता आणि ते प्रत्येक मतदारसंघात कशासाठी जातात हे सगळ्यांना माहिती आहे. मात्र कोणीही शिक्षकांना विकत घेऊ नये. शिक्षक पेशातील परंपरा मोडू नये. असे करणाऱ्यांना शिक्षक योग्य धडा शिकवतील, असा इशाराही राऊतांनी यावेळी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT