Nashik Teachers constituency : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल नाशिक मध्ये होते. त्यांनी शिक्षक मतदार संघाचे उमेदवार आमदार किशोर दराडे यांचा प्रचार केला. मुख्यमंत्र्यांची पाठ फिरताच शिवसेना नेते संजय राऊत येथे दाखल झाले आहेत.
महायुतीच्या लोकप्रतिनिधी आणि आमदारांमध्ये दोन गट पडले आहेत. त्यातून सावरण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल संस्थाचालकांच्या बैठका घेतल्या. मात्र नाशिकमध्ये या बैठकीला कोणतीही नामांकित शिक्षण संस्था किंवा त्यांचे पदाधिकारी उपस्थित नव्हते. यंदांची निवडणूक वेगळ्याच वळणावर पोचली आहे.
लोकसभा निवडणुकी पाठोपाठ शिक्षक मतदार संघातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (EKnath Shinde) आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार परस्परांविरुद्ध उभे ठाकले आहेत. त्यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांच्या पाठोपाठ शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीही सुरुवात केली आहे. त्यामुळे यंदाची शिक्षकांची निवडणूक रोज नवे वळण घेत आहे.
नाशिक शिक्षक विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीमध्ये फूट पडली आहे. शिंदे गटाचे आमदार किशोर दराडे उमेदवार आहेत. त्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अजित पवार गटाचे महेंद्र भावसार हे देखील उमेदवार आहेत. त्यामुळे महायुतीच्या लोकप्रतिनिधी आणि आमदारांमध्ये दोन गट पडले आहेत. त्यातून सावरण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल संस्थाचालकांच्या बैठका घेतल्या. मात्र नाशिकमध्ये या बैठकीला कोणतीही नामांकित शिक्षण संस्था किंवा त्यांचे पदाधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा किती यशस्वी होतो याविषयी उत्सुकता आहे.
मुख्यमंत्र्यांपाठोपाठ शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संदीप गुळवे यांच्या प्रचारासाठी खासदार संजय राऊत नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. आज सायंकाळी ते शिक्षक मतदारांची बैठक घेतील. या निवडणुकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्तिशः लक्ष घातले आहे. ते रोज विविध पदाधिकाऱ्यांना संपर्क करून निवडणुकीचा आढावा घेत आहेत. या परिस्थितीत अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी या दोन्ही उमेदवारांपुढे मोठे आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे दोन्ही शिवसेनेच्या उमेदवारांना रोखण्यात श्री कोल्हे यशस्वी होतात का? याचीही चर्चा होत आहे. त्यात खासदार संजय राऊत प्रचारात काय रंग भरतात हे आज स्पष्ट होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.