Kishore Darade Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Video Kishore Darade: मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर शिक्षकांना पैसे वाटले; अंधारेंच्या आरोपावर दराडे संतापले

Nashik Teachers Constituency Kishore Darade denied Sushma Andhare allegations: गेल्या सहा महिन्यांपासून मतदार नोंदणी प्रशासनातर्फे सुरू असून सर्व नियमात बसूनच ही नोंदणी सुरू आहे. बोगस नोंदीचा विषय येत नाही, असे दराडे यांनी स्पष्ट केले.

सरकारनामा ब्यूरो

नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणुकीत पैसे वाटल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावरून राजकारण पेटलं आहे. पैसे वाटप करतानाचा व्हिडिओ ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एक्सवरुन पोस्ट केला आहे. अंधारेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

नाशिक शिक्षक मतदारसंघाचे शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे (Kishore Darade) यांनी जळगाव येथील मुख्यमंत्र्यांच्या प्रचार सभेनंतर शिक्षकांना पैसे वाटप करण्यात आल्याचे सुषमा अंधारे यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत.

एवढ्या मोठ्या सभेमध्ये असे पैसे वाटणार आहे का, त्यांच्याकडे काही मुद्दे नाही त्यामुळे चुकीचे आरोप त्या करीत आहेत, असे दराडे म्हणाले. सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी लावलेले सर्व आरोप दराडे यांनी फेटाळले आहेत.

अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे (Vivek Kolhe)यांनी देखील किशोर दराडे यांच्यावर बोगस शिक्षक मतदारांची नोंद केल्याचा आरोप केला आहे. त्यावर कोल्हे यांना शिक्षण क्षेत्रातलं कळत नाही, गेल्या सहा महिन्यांपासून मतदार नोंदणी प्रशासनातर्फे सुरू असून सर्व नियमात बसूनच ही नोंदणी सुरू आहे. बोगस नोंदीचा विषय येत नाही, असे दराडे यांनी स्पष्ट केले. कोपरगावला 670 शिक्षक एकाच दिवशी कसे तयार झाले, असा प्रश्न दराडे यांनी कोल्हेंना विचारला आहे.

नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक येत्या २६ जून रोजी होणार आहे. यानिमित्ताने काल (शनिवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जळगावात सभा झाली. मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर शिक्षकांना पैसे वाटप केल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.

महायुतीचे उमेदवार दराडे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जळगावातील आदित्य लॉन्स येथे सभा झाली. सभेनंतर जिल्ह्यातील आलेले प्रत्येक शाळेचे शिक्षक, कर्मचारी, मुख्याध्यापक, संस्थाचालक यांना पैसे वाटप करण्यात आले. कुठे आहे निवडणूक आयोग?, असा आरोप अंधारे यांनी एक्सवर केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT