Video Vishwajeet Kadam : विशाल पाटील मुख्यमंत्रिपदावरुन बोलून गेले; डॉ. विश्वजीत कदमांनी जागेवरच 'करेक्ट' केले

Vishal Patil On Maharashtra CM : विशाल पाटील म्हणाले, पुढचा मुख्यमंत्री सांगलीचाच, तर विश्वजीत कदमांनी, मुख्यमंत्री सांगलीचा असेल की नाही हे येणारा काळ सांगेल, पण तो काँग्रेसचाच असेल, असे स्पष्ट केले.
Vishwajeet Kadam
Vishwajeet KadamSarkarnama

Sangli News : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीचे 'चॅलेंज' मोडून काढत काँग्रेसचे आमदार डॉ. विश्वजीत कदमांच्या ताकदीने विशाल पाटलांनी सांगली जिंकली. खासदार होताच विशाल पाटलांचा 'कॉन्फिडन्स' भलताच वाढल्याचे दिसत आहे.

विशाल पाटलांनी मिरजेतील एका कार्यक्रमात, 'राज्यात वसंतदादांच्या विचारांचा मुख्यमंत्री झाला पाहिजे आणि तो सांगलीचाच असावा,' अशी अपेक्षा कदमांपुढेच बोलून दाखवली.

त्यानंतर आपल्या भाषणात डॉ. विश्वजीत कदमांनी विशाल पाटलांच्या अपेक्षांवर भूमिका मांडली. 'येणाऱ्या काळात या राज्यात काँग्रेसचाच मुख्यमंत्री पाहायाला मिळेल, पण तो सांगली जिल्ह्याचा असेल का नाही हा येणारा काळ ठरवेल,' असे कदमांनी स्पष्ट केले.

विशाल पाटील म्हणाले, 'आता काँग्रेस एक झाली आहे. या राज्यात वसंतदादांच्या विचारांचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. सांगली जिल्ह्याचा माणूस पुन्हा मुख्यमंत्री झाला पाहिजे. विश्वजीत कदमांच्या वतीने झाला पाहिजे.'

पाटलांच्या विधानाने राजकीय वर्तुळात वेगळी चर्चा होणार, हे जाणून असलेल्या विश्वजीत कदमांनी त्याच सभेतून मुख्यमंत्रिपदाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

'राज्यात येणाऱ्या काळात मुख्यमंत्री पाहायाला मिळेल; पण तो सांगली जिल्ह्याचा असेल की नाही हा येणारा काळ ठरवेल. पण तो काँग्रेस पक्षाचा असेल हे तुम्हाला मी नक्की सांगू शकतो,' असे जाहीरपणे सांगून विश्वजीत कदमांनी विशाल पाटलांच्या अपेक्षांना त्याच स्टेजवरून आवर घातला.

Vishwajeet Kadam
Mangesh Chavan: भाजप आमदार मंगेश चव्हाण यांना जीवे मारण्याची धमकी

लोकसभा निवडणुकीत विश्वजीत कदम आणि विशाल पाटील सांगलीत महाविकास आघाडी आणि महायुतीला भारी ठरले आहेत. त्यांनी पक्ष म्हणून निवडणूक जिंकून राज्यासह देशात काँग्रेसची ताकद वाढवली.

त्यानंतर मात्र जाहीर कार्यक्रमात विशाल पाटलांनी मुख्यमंत्रिपदावरून भूमिका मांडल्याने राजकीय पटलावर विविध चर्चेला तोंड फुटले. मात्र त्याच सभेत पाटलांच्या मतावर विश्वजीत कदमांनी जाहीरपणे भूमिका मांडत विशाल पाटलांच्या मतांना 'करेक्ट' केले. यानिमित्ताने विश्वाजीत कदमांनी एकप्रकारे विशाल पाटलांनाच समजावून सांगण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com