Ashok Uike Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ashok Uike : आदिवासी निधीचा मोठा वाद! अशोक उईके यांच्या 'त्या' खेळीने नरहरी झिरवाळ यांनाही गुंडाळले? नेमकं शिजतंय तरी काय?

Ashok Uike tribal fund controversy : आदिवासी निधीवरून महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. अशोक उईके यांची नेमकी काय खेळी आहे? या प्रकरणात नरहरी झिरवाळ यांची भूमिका काय? जाणून घ्या सविस्तर.

Sampat Devgire

Dr Ashok Uike News: राज्यातील कंत्राटदारांनी आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांच्या विरोधात आंदोलनाचे शस्त्र उपसले आहे. आदिवासी विभागाच्या भाजपच्या आजी-माजी मंत्र्यांचे राजकारण आणि कुरघोडी त्यामुळे उघड झाली. आता त्याला वेगळेच राजकीय वळण मिळण्याची चिन्हे आहेत.

विद्यमान आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके आणि त्यांच्या विभागाच्या सचिवांनी गेल्या दोन वर्षांपासून निधी वितरित करणे थांबविले आहे. त्यामुळे राज्यभर सुरू असलेल्या कामांना त्याची झळ बसली. एकट्या नाशिक विभागात सात हजार कोटींची कामे रखडली आहेत.

माजी आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित यांनी मंजूर केलेल्या कामांचा विद्यमान मंत्र्यांनी निधी रोखला. त्यामुळे राज्यभरातील कंत्राटदार संतप्त झाले आहेत. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात आदिवासी मंत्री डॉ उईके यांच्या विरोधात आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.

मात्र डॉ अशोक उईके यांनीही या आरोपाला सडेतोड उत्तर देत भाजपच्या माजीमंत्रांबरोबरच महायुतीतील विद्यमान मंत्री नरहरी झिरवाळ यांनाही गुंडाळले आहे. मंत्री झिरवाळ यांच्या दिंडोरी मतदार संघात ८०० कोटींची कामे झालीच कशी? असा गंभीर प्रश्न मंत्र्यांनी उपस्थित केला.

माजी मंत्री डॉ गावित यांनी विद्यमान मंत्री डॉ उईके यांच्या मतदारसंघातील कामांना निधी रोखला होता. त्याची परतफेड डॉ उईके गावित यांनी मंजूर केलेल्या कामांचा निधी रोखून करीत आहेत, असा कंत्राटदारांचा आरोप आहे.

या आरोपाचा मंत्री डॉ उईके यांनी इन्कार केला. ते म्हणाले, दहा हजार कामांना मंजुरी मिळालीच कशी? हा गंभीर प्रश्न आहे. यातील पाचशे कामे देखील पूर्ण झालेली नाहीत. आदिवासी विकास विभागाने रस्त्यांसाठी निधी दिलेला असताना अनेक ठिकाणी पूल बांधण्यात आल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. मंत्री उईके यांच्या या प्रतीतराने आदिवासी विकास निधीत गैरव्यवहार झाल्याचा अप्रत्यक्ष आरोप खुद्द मंत्र्यांनीच केला आहे. त्यामुळे भाजप अंतर्गत राजकारणाची झळ आता महायुतीतील तिसऱ्या मंत्रालय बसण्याची शक्यता आहे.

SCROLL FOR NEXT