Abhijit Deepake Abhijit Deepake
उत्तर महाराष्ट्र

Tribal gen Z: कॉक्रोच पार्टी भाजपला अस्वस्थ करणार; आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर दिला थेट `हा` अल्टिमेटम!

Nashik tribal student movement CJP Abhijeet Deepke preparing to take the agitation to Mumbai -आदिवासी विद्यार्थी आंदोलनाच्या प्रश्नावर अभिजीत दिपके मुंबईत 'जंतर मंतर'ची पुनरावृत्ती करण्याच्या तयारीत?

Sampat Devgire

Abhijeet Dipake News: राज्यातील आदिवासी वसतीगृह आणि आश्रम शाळांच्या प्रश्नांवर नासिक येथे आंदोलन सुरू आहे. आदिवासी "जेन झी"वर्गाचे हे आंदोलन चर्चेत आहे. मात्र सरकारने त्याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. 

आदिवासी विद्यार्थ्यांचा गेल्या काही दिवसांपासून नाशिक मध्ये एल्गार सुरू आहे. या विद्यार्थ्यांनी उपोषण सुरू केले आहे. दोन दिवसांपूर्वी शक्ती प्रदर्शन करीत त्यांनी आदिवासी आयुक्त कार्यालयाला दणका दिला होता. 

आता हे आंदोलन सरकारला अडचणीचे ठरण्याची चिन्हे आहेत. लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांची विद्यार्थ्यांनी भेट घेतली. त्यानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी काल या आंदोलकांची भेट घेऊन पाठिंबा जाहीर केला. त्या पाठोपाठ कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दिपके यांनीही या विद्यार्थ्यांना आपले समर्थन जाहीर केले आहे. 

अभिजीत दिपके यांनी गुरुवारी या विद्यार्थ्यांची भेट घेतली. विद्यार्थ्यांच्या मागण्या अतिशय रास्त आणि सामान्य आहेत. मग राजकीय मंडळींना वाचविण्यासाठी राज्य सरकार त्याकडे दुर्लक्ष करते, असे चित्र का निर्माण झाले? असा प्रश्न त्यांनी केला. 

राज्यात गेल्या दोन वर्षात ५९० आदिवासी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तरीही सरकार या प्रश्नावर मौन आहे. त्याची चौकशी होऊन दोषींवर गंभीर कारवाई यापूर्वीच व्हायला हवी होती. विद्यार्थ्यांना आंदोलन करण्याची वेळ का येते?, असा प्रश्न दीपके यांनी केला. 

या आंदोलकांची दखल घेत तातडीने राज्य सरकारने निर्णय घ्यावा. नेता आदिवासींचे आंदोलन मुंबईत धडकणार. त्याला कॉक्रो जनता पार्टीचे समर्थन दिले जाईल. यानिमित्ताने दिल्लीतील जंतर मंतर येथील आंदोलनाची पुनरावृत्ती मुंबईत होण्याचे संकेत दीपके यांनी दिले. 

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT