Nashik Water Pollution Report Submitted to CM Devendra Fadnavis Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik News : नाशिककरांना कॅन्सरचा धोका? 'त्या' गंभीर प्रकरणाचा अहवाल थेट CM फडणवीसांकडे

Nashik Water Pollution Report Submitted to CM Devendra Fadnavis : नाशिक शहरात रसायनयुक्त पिवळ्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या परिसरातील भूजल अक्षरक्ष: विषारी बनला असून त्यात क्रोमियम हेक्साव्हॅलेंट प्रमाणापेक्षा जास्त आढळले आहे.

Ganesh Sonawane

Nashik water pollution cancer risk news : नाशिकच्या अंबड येथील दत्तनगरसह आसपासच्या परिसरातील अनेक बोअरवेलमधून येणाऱ्या रसायनयुक्त पिवळ्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पाण्यात कर्करोगजन्य मानले जाणारे क्रोमियम हेक्साव्हॅलेंट आढळले असून त्याचे प्रमाण अपेक्षित मर्यादेपेक्षा तब्बल हजारपट अधिक आहे.

या परिसरातील भूजल अक्षरक्ष: विषारी बनला आहे. बोअरवेलमधून रसायनयुक्त पिवळे पाणी येत आहे. त्यामुळे परिसरातील सुमारे 25 हजार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. 19 जणांना त्वचेचे गंभीर आजार झाले आहेत. नागरिकांनी आवाज उठविल्यावर प्रशासनाने 50 हून अधिक उद्योगांची तपासणी करून 10 हून अधिक कंपन्यांवर कारवाई केली आहे. या गंभीर प्रकरणाचा अहवाल जिल्हा प्रशासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला आहे.

या पिवळ्या पाण्याची प्रयोग शाळेत तपासणी केली असता, पाण्याच्या नमुन्यांमध्ये प्रतिलिटर 0.05 मिलिग्रॅम अपेक्षित असताना तब्बल 50.3 मिलिग्रॅम क्रोमियम आढळल्याची माहिती समोर आली. दरम्यान, नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, यासाठी परिसरातील बोअरवेल ‘सील’ करून बंद करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

दत्तनगरसह अंबड औद्योगिक परिसरात दूषित पाण्याचे स्रोत शोधण्यासाठी प्रशासन कामाला लागलं आहे. आतापर्यंत 50 हून अधिक उद्योगांची झाडाझडती घेत तपासणी केली असून त्यातील काही उद्योगांना बंद करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तर, काही उद्योग ‘सील’ करण्यात आले आहेत. या तपासणीत सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा बंद असणे तसेच आवश्यक तांत्रिक नियमांचे पालन न करणे यांसारख्या बाबी आढळलेल्या दहाहून अधिक उद्योगांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या पिवळ्या पाण्यात कॅन्सरचा धोका वाढविणारे क्रोमियम हेक्साव्हॅलेंट हे रसायन मर्यादेपेक्षा अधिक आढळल्याने नाशिककरांच्या चिंतेत भर पडली आहे. प्रशासनाने दत्तनगर आणि परिसरावर लक्ष केंद्रित केले असून दूषित पाण्याचे स्रोत शोधले जात आहेत. दूषित पाण्याचा प्रवाह रोखण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळा तोंडावर आला असताना प्रशासनासमोर हे नवे आव्हान निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT