Nashik Power station Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

भारनियमनाच्या संकटात नाशिक झाले राज्यासाठी आधार!

महानिर्मितीच्या नाशिक औष्णिक विद्युत केंद्राच्या २७ व्या संचांमधून होणार वीजनिर्मिती.

Sampat Devgire

नाशिक: राज्यात (Maharashtra) एकीकडे कोळसा टंचाई मुळे भारनियमनाची (Power Shortage) परिस्थिती उद्भवली असतांना महानिर्मितीच्या इतिहासात गेल्या १० वर्षांत २७ पैकी २७ संचांमधून वीज निर्मिती झाली नव्हती. यंदा मात्र नाशिकच्या (Nashik) सर्व २७ संचांमधून वीजनिर्मिती होणार आहे. त्यामुळे भारनियमनाच्या काळात नाशिक राज्यासाठी आधार ठरले.

गत काही वर्षांपासून महानिर्मितीचे 7 ते 10 संच अनेकदा झिरो शेड्युल तर तांत्रिक कारणांमुळे व पाण्यामुळे बंद रहात होते. परंतु आज च्या मितीला नाशिक वगळता कोराडी, खापरखेडा, पारस, परळी, चंद्रपूर, भुसावळ या सहा ही केंद्रातील सर्व २६ संच सुरू आहेत. आता नाशिकच्या तीन पैकी बंद असलेल्या एक संच सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

त्यादृष्टीने येथे कामगार अभियंत्यांची कमतरता असल्याने तिसरा संच सुरू करण्यास अडचणी येत होत्या. आता डेप्युटेशनवरील तंत्रज्ञ व अभियंत्यांच्या नाशिकला प्रतिनियुक्तीवर बदल्या झाल्या आहेत. येत्या काही दिवसात नाशिकच्या तिसऱ्या संचांमधून देखील वीजनिर्मिती सुरू होईल. महानिर्मितीचा सर्व संच सुरू राहण्याचा हा उच्चांक होणार आहे.

शुक्रवारी दुपारी नाशिकला ३०७ मेगावॅट, कोराडीला १७२७, खापरखेडा ९८०, पारस ४४२, परळी ५२५, चंद्रपूर २२१३, भुसावळ ८८४ मेगावॅट अशी वीज निर्मिती सुरू होती. त्यात २७ पैकी नाशिकचा फक्त एक संच बंद आहे. उरण वायू केंद्रातून २१४ मेगावॅट, जलविद्युत मध्ये घाटघर वगळता सर्व वीज केंद्रातून ८७० मेगावॅट, तर सोलर मधून ९५ मेगावॅट वीजनिर्मिती सुरू आहे. महानिर्मितीची ८७०० मेगावॅट वीजनिर्मिती सुरू होती.

प्रतिनियुक्तीवर नियुक्त कामगार -अभियंत्यांच्या बदल्यांमुळे नाशिकचा तिसरा संच सुरू होण्याच्या मार्ग मोकळा झाला आहे. त्यात महानिर्मितीमध्ये नाशिकचे महत्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.

–--

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT