NMC BJP News : नाशिक महापालिका निवडणुकीचा प्रचाराचा ज्वर शिगेला पोहोचला आहे. यामध्ये एका अधिकाऱ्याची चूक सत्ताधारी भाजपची डोकेदुखी बनली आहे. उमेदवारांपासून तर थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत त्यावर खुलासा करण्याची वेळ भाजपवर आली. हा या निवडणुकीतील सर्वाधिक चर्चेचा विषय आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाशिक महापालिका निवडणूक प्रचाराची सभा रविवारी झाली. या सभेत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. भाजपच्या विविध घोषणांची माहिती दिली.
या निवडणुकीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी विरोधकांना थेट आव्हान दिले. मात्र विविध नेत्यांच्या भाषणात प्रामुख्याने तपोवन आतील वृक्षतोड हा विषय आला. वृक्षतोड होणार नाही यावर प्रत्येकाने खुलासा करण्याचा प्रयत्न केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत मनसेवर पलटवार केला. तपोवन आत यापूर्वी झाडे नव्हती. 2016 मध्ये मनसेची सत्ता असताना या ठिकाणी व्यावसायिक वापर व्हावा असा ठराव महापालिकेने केला होता, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरच महापालिकेतील एका महिला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वृक्षतोडीचा निर्णय घेतला. तपोणातील 1700 झाडे तोडणे, व्यावसायिक प्रदर्शन केंद्राची निविदा प्रसिद्ध करणे याबाबत कोणालाही विश्वासात न घेता त्यांनी परस्पर निर्णय घेतला. वास्तवात मात्र एवढी झाडे तोडलीच जाणार नव्हती. त्या महिला अधिकाऱ्याची 'ती' चूक भाजपला महागात पडली.
त्यावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी वृक्ष लागवडीचा निर्णय घेतला. महापालिका अधिकाऱ्याला चुकीच्या निर्णयासाठी फैलावर देखील घेतले. नाशिककरांना दिलासा देण्यासाठी विविध पावले टाकण्यात आले. एकटे गिरीश महाजन यावर लढत असताना भाजपचा एक आमदार मात्र पडद्यामागून आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न करीत होता, असे बोलले जाते.
पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्त्यांसह भाजप वगळता जवळपास सर्व राजकीय पक्षांनी हा राजकीय मुद्दा केला. तपोवनातील वृक्षतोडीला एका सुरात विरोध केला. मनसे प्रमुख राज ठाकरे ते काँग्रेस सह सर्व पक्ष तपोवनातील आंदोलनात उतरले.
महापालिका निवडणुकीच्या प्रचारात हा मुद्दा प्रमुख मुद्दा करण्याचे प्रयत्न विरोधकांनी केला. अनेक उमेदवारांनी तपोवन जाऊन वृक्षतोड होऊ देणार नाही असे प्रतिज्ञापत्र दिले. विरोधकांच्या प्रत्येक सभेत या प्रश्नावरून भाजपला टार्गेट करण्यात आले. भाजपच्या उमेदवारांपासून तर थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत प्रत्येकाला या विषयावर स्पष्टीकरण द्यावे लागले.
महापालिकेतील त्या महिला अधिकाऱ्याने कोणताही सारासार विचार न करता हा व्यक्तिगत निर्णय घेतला होता. याबाबत अनेकांनी वास्तव सांगण्याचा प्रयत्न केल्यावर महिलेचा इगो हर्ट झाला. त्या माघार घेण्यापेक्षा अधिक आक्रमक झाल्या. महिला अधिकाऱ्याची त्या चुकीची राजकीय किंमत मात्र भाजपला चुकवावी लागली. यामध्ये जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी प्रचंड धावपळ केली. कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले. नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मात्र राजकारण व्हायचे ते झालेच. विरोधकांना आयता मुद्दा मिळाला, त्याचा लाभ त्यांनी उठवला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.