Satej Patil : 'एक तर आम्ही नाहीतर त्यांनी, अशीच तयारी केली होती', एकदा टीका केल्यानंतर सतेज पाटील शांत का बसले

Vinay Kore hits back Satej Patil Over Criticism : कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी महायुतीसह महाविकास आघाडीने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.
Jansurajya Shakti and RPI Release Manifesto for Kolhapur Municipal Elections; Vinay Kore
Jansurajya Shakti and RPI Release Manifesto for Kolhapur Municipal Elections; Vinay Kore sarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी जनसुराज्य शक्ती व RPI चा जाहीरनामा जाहीर झाला.

  2. शहराची हद्दवाढ, रस्ते आणि मूलभूत सुविधा हे प्रमुख मुद्दे मांडण्यात आले.

  3. सतेज पाटील यांच्या टीकेवर आमदार विनय कोरे यांनी पत्रकार परिषदेत पलटवार केला.

कोल्हापूर : राहुल गडकर

कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज जनसुराज्य शक्ती आणि रिपब्लिकन ऑफ पार्टी यांच्या वतीने जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. शहरातील मूलभूत सुविधांसह शहराची हद्दवाढ रस्ते या प्रमुख मुद्द्यांवर जनसुराज्य शक्तीने भर दिला आहे. त्यासंदर्भात आज पत्रकार परिषद घेत जनसुराज्य शक्तीचे नेते आणि आमदार विनय कोरे यांनी या जाहीरनाम्याची घोषणा केली. तसेच त्यांनी यावेळी सतेज पाटील यांच्या टीकेवर पलटवार करताना, एक तर आम्ही थांबावं किंवा त्यांनी तर थांबावं अशीच पुढची तयारी मी त्यांच्या टीकेनंतर केली होती, असे कोरे यांनी म्हटलं आहे. यावेळी आमदार अशोकराव माने, जनसुराज्याचे प्रदेश अध्यक्ष समित कदम , आरपीआय चे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांची उपस्थिती होती.

सतेज पाटील यांच्या टीकेनंतर मी काही जागांचा उल्लेख केला त्या किरकोळ आहेत. मी तर त्याच्या पुढची तयारी केली होती. एक तर आम्ही तर थांबावं किंवा त्यांनी तर थांबावं. पण माझ्या पहिल्याच उत्तरानंतर त्यांच्याकडून आरोप बंद झाले. नाहीतर माझ्याकडून बिंदू चौकातून जाहीर आव्हान देण्याचा प्रयत्न होणार होता.

पण माझ्याकडे राजकीय संस्कृती आहे. सतेज पाटील हे माझ्यावर बोलले हेच धक्कादायक होतं आणि ते माझ्या कार्यकर्त्यांना ही पटले आहे. विधान परिषदेला आपण त्यांना मदत केली आणि यांनी माझ्यावर असा आरोप केला. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना संतप्त झाल्या होत्या. पण त्यांनी केलेल्या वक्तव्याला जनताच त्यांना काही दिवसात उत्तर देईल, असे सूचक विधान विनय कोरे यांनी केले.

Jansurajya Shakti and RPI Release Manifesto for Kolhapur Municipal Elections; Vinay Kore
Satej Patil: राहुल गांधी स्टाईल सतेज पाटलांची पत्रकार परिषद; महायुतीला झोडपून काढत विचारला जाब

सतेज पाटलांचा आरोप ठरला खरा

कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होत असताना युतीतून बाहेर पडत जनसुराज्य शक्तीने 27 जागांवर उमेदवार दिले आहेत. जनसुराज्य शक्ती, आरपीआय आठवले गट आणि आर पी कवाडे गटासोबत युती करत जनसुराज्य शक्तीचे आमदार विनय कोरे यांनी आखाड्यात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

मात्र महायुतीतून बाहेर पडल्यानंतर जनसुराज्य हा महाविकास आघाडीवर अधिक तुटून पडला आहे. त्यामुळे काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी जनसुराज्य हा पक्ष भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला होता. आता त्यांचे हे आरोप कुठेतरी सत्यात उतरताना दिसत आहेत.

कारण काही प्रभागांमध्ये जनसुराज्य पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारानिमित्त शहरात फिरत असलेल्या रिक्षांवर भाजपचे झेंडे लागले आहेत. आज त्यावर देखील आमदार विनय कोरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. काही प्रभागामध्ये भाजपचा उमेदवार नाही त्यामुळे स्थानिक पातळीवर जो काय समितीने निर्णय घेतला आहे. त्याबाबत आपल्याला कल्पना नसल्याचे म्हणत स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न आमदार कोरे यांनी केला आहे.

जाहीरनाम्यातील महत्वाचे मुद्दे

*शहरासह उपनगरातील अंतर्गत व मुख्य चौपदरी मजबूत व सुशोभित रस्ते.. रिंग रोड पूर्तता...

* शहराबाहेरून जड वाहतूक... बस लेन, सायकल ट्रॅक, पादचारी मार्ग...

* स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल... सी.सी.टी.व्ही... शहरातंर्गत वाहतूकीला शिस्त...

* नियोजनबध्द शहर विस्तार... शहरातील प्रमुख ठिकाणी

* आधुनिक व स्वच्छ मल्टी-लेव्हल पार्कीग... सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नियोजन..

* डिजीटल व आय.टी.हब

* ऐतिहासिक, आध्यात्मिक स्थळे आणि वास्तु, प्राचीन तलाव, नदी किनारा आदींच्या परिसरामध्ये आकर्षक बगीचे, फाऊंटन लाईट-साऊंडच्या माध्यमातून खुलणारे कोल्हापूरचे वैभव डिजीटल माहितीफलक, गाईड सुविधा हेरिटेज वॉक...

* जागतिक कुस्ती महोत्सव, सांस्कृतिक फेस्टिव्हल...

* फुड अँण्ड कल्चरल स्ट्रिट

* हस्तकला, महिला बचत गट आणि शेतकरी उत्पादने बाजारपेठ...

* पर्यटनवृध्दीतून व्यवसाय, रोजगारवृध्दी... कोल्हापूर शहराची नवी ओळख...

* प्रत्येक घरात सुरक्षिततेची भावना निर्माण करणारी दर्जेदार आरोग्यव्यवस्था...

* प्रभागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रे... दवाखान्यांचे आधुनिकीकरण आणि तज्ञ डॉक्टर्स सेवा... आपत्कालीन आणि तातडीच्या सेवेसाठी दवाखाने...

* उद्याने आणि खुली व्यायाम ठिकाणे... पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासणी...

* मोफत आरोग्य तपासणी... डिजीटल हेल्थ कार्ड मोबाईल हेल्थ व्हॅन...

Jansurajya Shakti and RPI Release Manifesto for Kolhapur Municipal Elections; Vinay Kore
Satej Patil : बंटी पाटलांनी स्वतःचे हॉटेल, हॉस्पिटल अन् कॉलेज वाढवले, पण कोल्हापुरसाठी..? शिंदेंचा शिलेदार तुटून पडला

FAQs :

1. कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी जाहीरनामा कोणी प्रसिद्ध केला?
जनसुराज्य शक्ती आणि रिपब्लिकन ऑफ पार्टी (RPI) यांनी.

2. जाहीरनाम्यात कोणते मुद्दे प्रमुख आहेत?
मूलभूत सुविधा, शहर हद्दवाढ आणि रस्ते विकास.

3. जाहीरनाम्याची घोषणा कोणी केली?
आमदार विनय कोरे यांनी पत्रकार परिषदेत.

4. सतेज पाटील यांच्या टीकेवर काय प्रतिक्रिया देण्यात आली?
विनय कोरे यांनी पलटवार करत थेट भूमिका मांडली.

5. या जाहीरनाम्याचा निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो?
कोल्हापूरमधील राजकीय समीकरणे आणि प्रचाराचा वेग वाढू शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com