A burnt truck at Pimpalgaon Jalal toll plaza in Nashik after a विवाद involving highway police, highlighting the shocking truck fire incident. Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Truck Fire Case: ड्रायव्हरने हप्त्या दिला नाही म्हणून महामार्ग पोलिसांनी चक्क ट्रक पेटवला, नाशिकमधील संतापजनक घटना

Highway Police Truck Burn Allegation: पिंपळगाव जलाल टोल नाक्यावर महामार्ग पोलिसांनी एक मालवाहू ट्रक अडवला. यावेळी दंड वसुलीच्या नावाखाली पोलिसांनी 30 हजारांची मागणी केली. शिवाय दंड भरायचा नसेल तर 'तु आम्हाला पाच हजार दे' असं पोलिसांनी ड्रायव्हरला सांगितलं.

Jagdish Patil

Highway Police Truck Burn Allegation: नाशिकच्या येवला येथील पिंपळगाव जलाल टोल नाका येथे महामार्ग पोलिसांनी ट्रक चालकाने पैसे दिले नाहीत म्हणून थेट ट्रक जाळल्याचा धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी जाळलेल्या ट्रकमध्ये आर्मीचे साहित्य असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या येवला येथील पिंपळगाव जलाल टोल नाक्यावर महामार्ग पोलिसांनी एक मालवाहू ट्रक अडवला. यावेळी दंड वसुलीच्या नावाखाली पोलिसांनी 30 हजारांची मागणी केली. शिवाय दंड भरायचा नसेल तर 'तु आम्हाला पाच हजार दे' असं पोलिसांनी ड्रायव्हरला सांगितलं.

मात्र, ड्रायव्हरने त्यांची ही ऑफर धुडकावत पैसे देण्यास नकार दिल्यामुळे पोलीस आणि ड्रायव्हरमध्ये मोठा वाद झाला. त्यानंतर पोलिसांनी थेट ट्रक ड्रायव्हरला मारहाण करत त्याचा मालवाहू ट्रक पेटवून दिल्याचा आरोप पंजाबी ट्रक चालकाने केला आहे. या घटनेनंतर येवला येथील अग्निशमन दलाने आग विझविण्याचे प्रयत्न केला.

मात्र ट्रक मधील सामान मोठ्या प्रमाणात जळालं होतं. दरम्यान, या प्रकरणी ट्रक चालकाने सांगितलं की, "मी पुण्याहून पंजाबमधील भटिंडा येथे निघालो होतो. ट्रकमध्ये आर्मीचे साहित्य आहे. महामार्गावर चेकपोस्टवर आलेल्या पोलिसांनी ट्रक अडवला आणि नो एन्ट्रीमध्ये ट्रक घातला आहेस. तुझ्या गाडीला 30,000 रुपयांचा दंड भरावा लागेल. त्याऐवजी तु आम्हाला पाच हजार दे अशी मागणी केली.

मात्र, मी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर एकाने माझ्या कानाखाली मारली. त्यातील एका पोलिसाच्या हातातील सिगारेटमुळे ट्रकने पेट घेतला. त्यामुळे गाडीतील सर्व सामान जळालं असून याबाबतचा व्हिडिओ देखील माझ्याकडे आहे.

शिवाय ट्रकला आग लागल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून पळ काढला", असे ट्रक ड्रायव्हरने सांगितलं. तर याचवेळी त्याने महामार्गावर पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर ट्रक चालकांना लुटलं जातं, असा आरोपी त्याने केला. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आता पोलिसांकडून सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT