Shiv Sena MLAs are preparing for the upcoming Nashik Zilla Parishad elections, with rural political influence emerging as a key focus. Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

ZP Election : तालुका अध्यक्षांना गाड्या वाटत शिवसेनेच्या आमदाराकडून ZP ची तयारी; पण सर्वाधिक आमदार असलेली राष्ट्रवादी गोंधळलेली

Nashik Zilla Parishad election : जिल्हा परिषद निवडणुकीवर आमदारांचे वर्चस्व आणि प्रभाव परिणामकारक ठरतो. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात सध्या सर्वाधिक सात आमदार नाशिक जिल्ह्यात आहेत. जिल्हा परिषदेच्या निम्म्याहून अधिक जागा या सात मतदारसंघांमध्ये समाविष्ट आहेत.

Sampat Devgire

Nashik News, 20 Sep : जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका डिसेंबर महिन्यात अपेक्षित आहेत. त्यादृष्टीने शिवसेनेचे आमदार जोरदार तयारीला लागले आहेत. जिल्हा परिषदेवर वर्चस्व मिळविण्याची व्यक्तिगत महत्त्वकांक्षा त्यामागे आहे.

नाशिक जिल्ह्यात सर्वच आमदार महायुतीचे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आणि ग्रामीण भागाच्या प्रश्नांवर आवाज उठविण्याची जबाबदारी विरोधकांवर आहे. सत्ताधारी मात्र वरिष्ठांचे धोरण ठरत नसल्याने गोंधळल्याचे चित्र आहे. शिवसेनेचे जिल्ह्यात दोन आमदार आहेत. यात दादा भुसे हे मंत्री तर सुहास कांदे हे नांदगावचे आमदार आहेत. आमदार कांदे यांनी जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्षांना गाड्या वाटल्या आहेत.

आमदार कांदे यांच्याकडे संघटनात्मक पद असल्याने हा निर्णय झाला असावा. मात्र मंत्री भुसे यांच्याशी त्यांचे फारसे राजकीय सख्य नसल्याचे लपून राहिलेले नाही. या स्थितीत जिल्हा परिषदेवर व्यक्तिगत वर्चस्व निर्माण करण्यासाठी त्यांचे हे डावपेच असावेत.

या गोंधळात पालकमंत्री आणि सत्तेची सर्व सुत्रे हाती असलेला भाजप सध्या कुंभमेळ्याच्या विकास कामांमध्ये रमला आहे. ही मोठी जबाबदारी असल्याने भाजपचे पालकमंत्री आणि सर्वच आमदार सध्या त्यावर फोकस करीत आहेत.

जिल्हा परिषद निवडणुकीवर आमदारांचे वर्चस्व आणि प्रभाव परिणामकारक ठरतो. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात सध्या सर्वाधिक सात आमदार नाशिक जिल्ह्यात आहेत. जिल्हा परिषदेच्या निम्म्याहून अधिक जागा या सात मतदारसंघांमध्ये समाविष्ट आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मात्र सध्या गोंधळलेला आहे. पक्षाचे बहुतांशी आमदार किती निधी मिळणार आणि तो सोयीच्या ठिकाणी सोयीच्या व्यक्तींना कसा वर्ग होईल या धडपडीत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणूक आकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वाधिक आमदार आणि एक प्रभावी मंत्री असूनही उदासीन असल्याचे चित्र आहे. त्यामुळे इच्छुक आणि कार्यकर्ते देखील काय धोरण ठरते याकडे डोळे लावून बसले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT