Ramgiri Maharaj, Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal : "मी स्वतः त्यांच्या कार्यक्रमाला जातो, पण..."; रामगिरी महाराजांच्या वक्तव्यावर भुजबळांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Jagdish Patil

Nashik News, 18 August : सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राज्यातील काही शहरांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. रामगिरी महाराजांना अटक करावी यासाठी विविध शहरात आंदोलक केली जात आहेत. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

महंत रामगिरी महाराजांच्या कार्यक्रमाला मी स्वतःही जात असतो. पण, आपल्या प्रबोधनातून दुसऱ्या धर्माचा उल्लेख करणं टाळलं पाहिजे. कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.

नाशिक (Nashik) येथील सिन्नरच्या पंचाळे गावामध्ये प्रवचनाच्या दरम्यान महंत रामगिरी महाराज (Ramgiri Maharaj) यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यांच्या वक्तव्यामुळे राज्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण तापलं आहे. छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगर शहरात या वक्तव्याचे पडसाद उमटले आहेत. तर या सर्व प्रकरणावर आता मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली.

छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले, "संत ज्ञानेश्र्वर, संत तुकाराम या संतांनी हे विश्वची माझे घर ही संकल्पना मांडली आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ अशी अनेक उदाहरणं संतांनी दिली आहेत. आपापल्या धर्माचा प्रचार प्रसार केला पाहिजे. महंत रामगिरी महाराज यांचे मोठे भक्तगण आहेत.

मी स्वतःही त्यांच्या कार्यक्रमाला जातो. पण, आपल्या प्रबोधनातून दुसऱ्या धर्माचा उल्लेख टाळला पाहिजे. कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाही याची काळजी घ्यावी. महंत रामगिरी महाराज यांनी कुणाचे मन दुखवू नये. हिंदू धर्म, मुस्लिम धर्म कोणीही कुणाचे मन दुखवू नये." अशा शब्दात त्यांनी या सर्व प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली.

महंत रामगिरी यांना अटक झाली पाहीजे

काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी महंत रामगिरी यांना अटक करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, "महंत रामगिरी यांना अटक झाली पाहीजे. आपल्या समाजात एकमेकांच्या धर्माचा आदर केला जातो. ईदला हिंदू आणि दिवाळीला मुस्लिम बांधव एकमेकांना शुभेच्छा देतात. ही या देशाची परंपरा आणि संस्कृती आहे. या लोकांना आपली संस्कृती बदलायची आहे. मुख्यमंत्री जर अशा प्रवृत्तीला समर्थन देत असतील तर त्यांना हटवलं पाहीजे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT