manikrao kokate aditya thackeray dada bhuse sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Guardian Minister : राष्ट्रवादी-शिवसेनेत पालकमंत्रिपदाबाबत समझोता! रायगडसाठी नाशिकवरील दावा सोडणार?

NCP Shivsena Guardian Minister Raigad Nashik : गेले महिनाभर नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी गिरीश महाजन प्रयत्नशील आहेत. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे सुद्धा आघाडीवर असल्याचे समजते.

Sampat Devgire

Guardian Minister News : पालकमंत्रिपदाच्या नियुक्तीसाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. त्यामुळे बहुतांशी मंत्र्यांनी मुंबईकडे कूच केली आहे. महत्त्वाच्या जिल्ह्यांसाठी भाजपने आपली शक्ती पणाला लावली आहे.नाशिकच्या पालकमंत्रीपदामध्ये भाजपचे वरिष्ठ मंत्री गिरीश महाजन यांना विशेष रस आहे. गिरीश महाजन हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. यंदाच्या मंत्रिमंडळ विस्तारात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळेच महाजन यांना स्थान मिळाल्याचे बोलले जाते.

गेले महिनाभर नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी गिरीश महाजन प्रयत्नशील आहेत. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे सुद्धा आघाडीवर असल्याचे समजते. आत्ता अचानक या स्पर्धेत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची एन्ट्री झाली आहेत. शिवसेनेच्या दादा भुसेंना नाशिकचे पालकमंत्री पद द्यावे त्याबदल्यात राष्ट्रवादीला रायगडचे पालकमंत्रिपद सोडण्यात येईल, अशी चर्चा आहे.

पालकमंत्री नियुक्त करताना ज्या जिल्ह्यात ज्या पक्षाचे आमदार जास्त त्या पक्षाच्या मंत्र्यांना प्राधान्य देण्याचा प्रस्ताव आहे. यावर महायुतीच्या नेत्यांमध्ये एक मत होत असल्याचे बोलले जाते. त्या दृष्टीने पालकमंत्री नियुक्तीच्या हालचाली आता गतिमान झाले आहेत त्याचे केंद्र सध्या मुंबई आहे.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस नाशिक जिल्ह्यात सात आमदार आहेत. त्यामुळे या पक्षाचे ताकद अन्य पक्षांच्या तुलनेत जास्त आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे नाव पालकमंत्रिपदासाठी आघाडीवर आहे. बहुतांश आमदारांचा देखील कोकाटे यांना पाठिंबा असल्याचे बोलले जाते.

रायगड जिल्ह्यात एकनाथ शिंदें यांच्या शिवसेनेचे आमदार अधिक आहेत. मात्र येथून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कन्या आणि महिला व बालकल्याण विकास मंत्री अदिती तटकरे या पालकमंत्रिपदासाठी आग्रही आहेत. त्यामुळे रायगड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देण्याचा विचार आहे. त्या बदल्यात नाशिकचे पालकमंत्री पद पुन्हा एकदा शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे दादा भुसे यांना द्यावे असा प्रस्ताव पुढे आल्याचे कळते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT