Sahebrao Patil News: पाचोर्यात शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार किशोर पाटील स्वबळाचा नारा दिला आहे. अमळनेरला मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे माजी मंत्री अनिल पाटील यांनी महायुतीचा झेंडा उंचावला आहे. हा निर्णय शिवसेनेला दिलासा ठरला.
नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील महायुतीच्या घटक पक्षांमध्ये राजकीय ओढाताण होत आहे. भाजपचे नेते, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यावर काय तोडगा काढतात याची उत्सुकता आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने मात्र महायुतीचा नारा दिला आहे. त्यासाठी माजी आमदार साहेबराव पाटील यांनी पुढाकार घेतला. माजी मंत्री अनिल पाटील आणि शिवसेना शिंदे पक्षाचे शिरीष चौधरी यांच्यातील मतभेद मिटवला.
पाचोरा भडगाव मतदार संघात आमदार किशोर पाटील यांनी स्वबळाचा नारा दिला. एवढेच नव्हे तर भाजपवर गंभीर आरोप केले. त्यामुळे त्यामुळे जळगावच्या महायुतीत मिठाचा खडा पडला आहे.
या संदर्भात बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा मेळावा झाला. यामध्ये कुंपणावरील इच्छुक आणि लक्ष्मी दर्शनाने येणाऱ्या समस्यांवर माजी आमदार साहेबराव पाटील यांनी बिनविरोधाचा रामबाण उपाय जाहीर केला.
गेल्या आठवड्यात माजी मंत्री अनिल पाटील यांनी शिवसेना शिंदे पक्षाचे शिरीष चौधरी यांना वगळून आघाडी करणार अशी घोषणा केली होती. त्यामुळे महायुतीचे नेतेच एकमेकांसमोर उभे ठाकले होते. माजी आमदार साहेबराव पाटील यांनी त्यावर तोडगा काढला.
गेल्या निवडणुकीत अंमळनेर नगरपालिकेत माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या पत्नी पुष्पलता या पाच वर्ष लोकनियुक्त नगराध्यक्ष होत्या. त्यांच्या गटाला २२ जागा तर शिरीष चौधरी यांना १२ जागा मिळाल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर निवडणूक बिनविरोध केल्यास अनेक अडचणी सुटणार आहेत. त्यासाठी साहेबराव पाटील यांनी महायुतीत बिनविरोधच्या चर्चेला तोंड फोडले आहे. साहेबराव पाटील आणि शिरीष चौधरी एकत्र आल्यास अमळनेर नगरपालिकेचे निवडणूक हमखास बिनविरोध होऊ शकते.
माजी आमदार साहेबराव पाटील यांचे हे डावपेच यशस्वी झाल्यास कुंपणावर राहून उमेदवारीसाठी दबाव वाढवणाऱ्यांना दणका बसेल. निवडणुकीत होणारे अफाट लक्ष्मी दर्शन टाळले जाऊ शकते. त्यामुळे साहेबराव पाटील यांचा हा रामबाण उपाय प्रत्यक्षात येईल काय? याची आता चर्चा सुरू झाली आहे. ते महायुती आणि भाजपच्या पथ्यावरच पडणार आहे.
------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.