Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal : महायुतीच्या नेत्यांची बेताल विधानं; छगन भुजबळांची गणपती बाप्पाला कोणती प्रार्थना!

Pradeep Pendhare

Mumbai News : विधानसभा निवडणूक जशी जवळ येऊ घातली आहे, तशी महायुतीत धुसफूस वाढू लागलीय. त्याच तुलनेत महाविकास आघाडीमध्ये समन्वय दिसतो. याचा महायुतीमधील जुणे-जाणत्या नेत्यांनी धसका घेतला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांनी महायुतींमधील नेत्यांच्या बेताल विधानाला वैतागले आहेत. त्यामुळं त्यांनी गणेश चतुर्थीनिमित्तानं गणपती बाप्पाकडं महायुतीमधील नेत्यांना, कार्यकर्त्यांना बुद्धी यावी, जेणे करून चुकीचे वक्तव्य करणार नाही, अशी प्रार्थना केली आहे.

महायुतीमधील नेते आणि कार्यकर्त्यांचे अलीकडच्या काळात एकमेकांवर जोरदार प्रहार सुरू आहेत. यातून बेताल वक्तव्य वाढलीत. अशा बेताल विधानांमुळे महायुतीमधील मित्र पक्ष अडचणीत येत आहेत. यातच वेगवेगळ्या सामाजिक घटनांमुळे महायुती सरकारवर विरोधकांनी हल्ले चढवून जनमाणसात प्रतिमा मलिन केली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीला समोरे जातांना महायुतीला अडचणी निर्माण होतील, अशी शंका राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) जुणे-जाणते नेते मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.

छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले, "महायुतीमधील नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये बेताल विधान करण्याची स्पर्धा सुरू झाल्याचं दिसते. गणपती बाप्पाकडं सर्वांना बुद्धी द्या, अशी प्रार्थना करणार आहे". आपण सगळे एक आहोत. सगळ्यांना विधानसभा निवडणुकीला समोरे जायचं आहे, त्यामुळे एकीनं काम करा, अशी बुद्धी गणपती बाप्पाकडं मागणार आहे, असेही छगन भुजबळ यांनी म्हटलं.

महायुतीमधील सर्वांना न्याय मिळणार आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षाला, सर्वांना न्याय मिळेल. दिल्लीतील नेत्यांना सुद्धा सर्वांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होईल. कोणावरही अन्याय होणार नाही, असे दिल्लीच्या नेत्यांनी स्पष्ट केले असताना, बाकीच्यांनी जागा वाटपावर विधानं करणं चुकीचं आहे, असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं. महायुतीत ज्या काही आता अचडणी निर्माण होत आहे, त्यावर तिन्ही पक्षानी एकत्रित येऊन त्या सोडवल्या पाहिजेत, असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं.

राष्ट्रवादीला हव्यात 60 पेक्षा अधिक जागा

राष्ट्रवादी काँग्रेसकडे अगोदरच 60 जागा आहे. अजितदादांनी कधीच वाढीव जागांची मागणी केलेली नाही. परंतु त्यावर अधिक 20 ते 25 जागा मिळाव्यात अशी अपेक्षा आहे. अजितदादांनी आमच्याकडे 60 जागा आहे, त्यावर अधिक जागा, असं म्हणणं आहे. पण किती ते त्यांनी सांगितलं नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT