Radhakrishna Vikhe : 'ते पटापटा पळून गेले'; राधाकृष्ण विखेंनी कोणावर केली टीका

Radhakrishna Vikhe criticism of Congress : भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे आणि आमदार पंकजा मुंडे यांनी काँग्रेससह महाविकास आघाडीवर टीका केली.
Radhakrishna Vikhe
Radhakrishna VikheSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar : "महायुती भाजप सरकार राज्यात यशस्वी वाटचाल करत आहेत. मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेमुळे या सरकारची लोकप्रियता वाढल्यामुळे महाविकास आघाडी सैरभैर झाली आहे.

काँग्रेस म्हणायची आम्ही खटाखट पैसे देऊन, पण ते आणि त्यांचे मविआचे नेते पटापट पळून गेले", असा टोला महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी लगावला.

भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे आणि आमदार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या उपस्थित राहाता पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण झाला. आमदार आशुतोष काळे, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के, जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे, माजी खासदार डॉ. सुजय विखे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी आशिष येरेकर आदी उपस्थित होते.

Radhakrishna Vikhe
Ahmednagar BJP Politics : 'नगरी' ग्राऊंडवर गुजरातची 'फिल्डिंग'; भाजपचा 'पॅर्टन' ठरणार का यशस्वी?

मंत्री विखे म्हणाले, "महायुती भाजप सरकारने राज्यात सरकारी योजनांच्या यशस्वी अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे हे सरकार राज्यात यशस्वी होताना दिसते. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लोकप्रिय आणि यशस्वी ठरली आहे. त्यामुळे या लाडक्या बहिणी महायुतीमधील भावांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणार असल्याचा विश्वास आहे. याचमुळे 'मविआ'तील नेते अस्वस्थ झाले आहेत". यातून खटाखट पैसे देण्याची घोषणा करणारे काँग्रेसवाले (Congress), ते आता पटापट पळून गेले, असा टोला मंत्री विखे यांनी लगावला.

Radhakrishna Vikhe
Dr Satish Patil Politics: राष्ट्रवादीने कोणाला हिणवले? रावेरचा 'तो' गद्दार कोण?

मुंडेंकडून मोठ मदत

राहाता पंचायत समिती इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात मंत्री राधाकृष्ण विखे यांनी आमदार पंकजा मुंडे यांचं कौतुक केले. विरोधी पक्षनेता असताना मुंडे यांनी राजकारण आड येवू न देता, या इमारतीच्या कामाला निधी उपलब्ध करुन दिला. मुंडे-विखे परिवाराचे असलेले ऋणानूबंध, आणि (कै.) बाळासाहेब विखे आणि (कै.) गोपीनाथ मुंडे यांनी राजकारणा पलीकडे जावून जपलेली मैत्री!, हे मुख्य कारण असल्याचे मंत्री विखे यांनी सांगितले.

मुंडेचा नागरी सत्कार

आमदार पंकजा मुंडे यांनी भाजप सरकारच्या काळात ग्रामविकास मंत्री असताना अनेक योजनांची अंमलबजावणी केली. राज्यात 98 पंचायत समितीच्या इमारतीकरिता 430 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. तसंच 3 लाख 70 हजार महिला बचत गट निर्माण करुन, त्यांना 4 हजार 200 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केलं होते, याची आठवण सांगितली. विधान परिषदेवर निवड झाल्याबद्दल आमदार पंकजा मुंडे यांचा नागरी सत्कार करण्यात आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com