Ajit Pawar Tanpure controversy Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ajit Pawar Tanpure Controversy : 'तनपुरे वाड्या'वर बंद दाराआड बरचं काही घडलं, अजितदादांनी पुढचं राजकाराण पेरलं!

Ajit Pawar's Secret Political Moves in Maharashtra: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राहुरी दौऱ्यात तनपुरे वाड्यावर स्नेहभोजन घेत, तनपुरे परिवाराशी बंद दाराआड चर्चा केली.

Pradeep Pendhare

Ahilyanagar Political News: राहुरीचा तनपुरे सहकारी कारखाना ताब्यात घेत, तनपुरेंनी राहुरीतील राजकीय ताकद पुन्हा दाखवली आहे. आगामी राजकारणाची दिशा हेरून तनपुरेंनी देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ देण्याची तयारी सुरू केली आहे.

माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे काका तथा राहुरी कृषि उत्पन्न बाजार समिती सभपाती, तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन अरुण तनपुरे यांनी सर्वात अगोदर अजितदादांबरोबर पुढे सरकले. यानंतर नंबर कोणाचा? अशी चर्चा राहुरीसह अहिल्यानगर जिल्ह्यात होती.

अरुण तनपुरे यांनी कृषि उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी (Farmers) निवासाचे अन् उपहारगृहाच्या इमारतीच्या उद्घाटनानिमित्ताने कार्यकर्ता मेळावा घेतला. अजितदादांनी या उद्घाटन सोहळ्यानंतर तनपुरे वाड्यावर हजेरी लावली.

अजितदादांनी तनपुरे कुटुंबांसमवेत स्नेहभोजन घेतल्यानंतर तब्बल अर्धा तास तनपुरे कुटुंबियांशी चर्चा केली. अहिल्यानगरमधील ही राजकीय पुढील राजकारण बदलणार असे संकेत देणारी असल्याची राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे.

उपमुख्यमंत्री पवार (Ajit Pawar) यांनी भोजनानंतर माजी खासदार प्रसाद तनपुरे, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, डॉ. उषाताई प्रसाद तनपुरे, सोनाली प्राजक्त तनपुरे व सोहम प्राजक्त तनपुरे यांच्याशी अर्धा तास एका खोलीत गोपनीय चर्चा केली. त्याचा तपशील बाहेर आला नाही. परंतु माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे पवार यांनी कौतुक केल्याचे समजते. या अर्ध्या तासांच्या चर्चेची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

अजितदादा तनपुरे वाड्यात येताच जोरदार स्वागत झाले. वाड्याच्या बाहेर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, यांचे पुत्र सोहम यांनं स्वागत केलं. सोहमच्या उंचीवरून पवार म्हणाले, ‘अजून किती उंच व्हायचंय, तुझ्याकडे पाहायलाही वर पहावं लागतं’, असा मिश्किल चिमटा घेतला. अजितदादांनी अचानक केलेल्या या प्रश्नाला सोहम यांनी आदरानं हसत प्रतिसाद दिला.

माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी पुढं अजितदादांचं स्वागत केले. यावेळी पवार यांनी माजी खासदार तनपुरे यांची आस्थेने चौकशी केली. ‘तब्येत कशी आहे. वय किती झाले.’ तनपुरे म्हणाले, की ‘उत्तम आहे, शरद पवार यांचे 84, माझे 83 वय आहे. पवार साहेब व माझ्यात सात महिन्यांचे अंतर आहे’, अशी आठवण करून दिली.

यावर अजितदादांनी, ‘साहेब जरा थकलेत. त्यांना धरावं लागतं, चालताना तोल जातो. बोलताना त्रास होतो, असं काळजीनं सांगितले. ‘पवार साहेब दुर्धर आजाराशी 25 वर्ष संघर्ष करीत आहेत. आर. आर. पाटलांनी फक्त सहा महिने संघर्ष केला,’ असं तनपुरेंनी यावेळी म्हणाले.

त्यावर ‘आर. आर. पाटलांनी चूक केली, त्यांनी आम्हाला सांगितलेच नाही’ असे भावनिक आठवण पवारांनी काढली. त्यानंतर अरुण तनपुरे यांच्या निवासस्थानी सुजाता तनपुरे, सायली तनपुरे यांनी औक्षण करून उपमुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT