'शिंदेंच्या मंत्र्यांनाच बदनाम करण्याचा कट'? रामदास कदमांचा धक्कादायक गौप्यस्फोट!, मुंबई गोवा महामार्गावरूनही दिला सरकारला घरचा आहेर

Ramdas Kadam On Yogesh Kadam : विधीमंडळाच्या अधिवेशनात मंत्री योगेश कदम यांच्यावर आरोप करण्यात आले होते. त्या पाठोपाठ सावली बारवरून देखील त्यांच्यावर विरोधखांनी निशाना साधला होता. यावरून माजी मंत्री तथा शिवसेना नेते रामदास कदम यांनी हल्लाबोल करत टीका केली आहे.
Anil Parab Vs Yogesh Kadam
Anil Parab Vs Yogesh Kadamsarkarnama
Published on
Updated on

Summary :

  1. रामदास कदम यांनी सावली बार प्रकरणावरून विरोधकांवर निशाणा साधत शिंदे गटातील मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप केला आहे.

  2. यापूर्वी अनिल परब यांनी वाळू चोरी आणि बार मालकीबाबत गंभीर आरोप केले होते, त्यानंतर रामदास कदम यांनी अनिल परब यांना 'अर्धवट वकील' म्हटलं होतं.

  3. खेड येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना कदम यांनी विरोधकांचा जोरदार समाचार घेत वाद पुन्हा उफाळला आहे.

Ratnagiri News : विधीमंडळाच्या अधिवेशनात मंत्री योगेश कदम यांच्यावर वाळू चोरी आणि सावली बारच्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब यांनी आरोप केले होते. अधिवेशनानंतरही त्यांनी सावली बारवरून निशाना साधला होता. यानंतर या प्रकरणात माजी मंत्री तथा शिवसेना नेते रामदास कदम यांनी स्पष्टीकरण देताना तो बार कदमांचाच असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. तसेच अनिल परब हे अर्धवट वकिल असल्याचा आरोप केला होता. यानंतर हे प्रकरण शांत झाले होते. पण आता पुन्हा एकदा रामदास कमद यांनी या प्रकरणावरून धक्कादायक दावा केला आहे. त्यांनी, एकनाथ शिंदेंच्याच मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का? याची शहानिशा करावी लागेल असे म्हटलं आहे. ते रत्नागिरी जिल्ह्यातील खेड नगरपरिषद खेड अंतर्गत स्व. मिनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र नुतनीकरण कामाच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाना साधला. (Savli Bar and Sand Theft Allegations Spark Fresh Political Drama Between Shiv Sena Factions)

यावेळी कदम यांनी, विधीमंडळाच्या अधिवेशनात करण्यात आलेल्या आरोपावर भाष्य केले. ते म्हणाले, अधिवेशनात आरोप करण्याआधी कलम 35अंतर्गत नोटीस द्यावी लागते, मात्र असे झालेले नाही. तरिही योगेश कदम यांच्यावर आरोप करण्यात आले. हे आरोप कसे स्वीकारण्यात आले? याबाबत खोलात जाणे महत्त्वाचं आहे. कारण अधिवेशनात एकनाथ शिंदे यांच्यांचं मंत्र्यांना बदनाम करण्याचे काम सुरू होते. हा कट आहे का? हे बघावे लागेल. आता कदम यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता असून त्यांचा नेमका रोख कोणाकडे होता असा सवाल आता उपस्थित केला जातोय.

Anil Parab Vs Yogesh Kadam
Ramdas Kadam : स्थानिकच्या रणागंणावर 'कदम-कदम बढाये जा'चा नारा! सामंताच्या ऑफरमुळे रामदासभाईंना ताकद

याचवेळी कदम यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून देखील सरकारला घरचा आहेर दिला असून हे काम का पूर्ण होत नाही असा सवाल केला आहे. तसेच शिवसेनेचा बालेकिल्ला आहे म्हणून या महामार्गाचे काम होत नाही का? असा सवाल देखील त्यांनी सरकारला विचारला आहे. यावेळी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना, कोकणात तुम्ही आलात, मुंबई-गोवा महामार्गही पहिला, आता मुंबईला जाताच या महामार्गाच्या कामाचे तेवढे बघा, अशी विनंती केली.

तसेच कदम म्हणाले, रामाचा वनवास बारा वर्षात संपला पण मुंबई गोवा महामार्गाचा वनवास काही संपेना. जोपर्यंत महामार्गाचा प्रश्न संपत नाही, तोपर्यंत गोगावले यांना पालकमंत्री पद नाही असा टोला देखील रामदास कदम यांनी लगावला. सध्या मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळं लोकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही ते म्हणाले.

दरोडेखोर दुसऱ्याला चोर म्हणायला लागलेत

यावेळी एकनाथ शिंदे यांनी योगेश कदम यांची बाजू घेताना ते काम करणारा कार्यकर्ता आहेत. पण दरोडेखोरच दुसऱ्याला चोर म्हणायला लागलेत. कारण नसताना श्रीकांत शिंदेंना टार्गेट करत आरोप केले जात आहेत. पण योगेश कदम असो की श्रीकांत शिंदे यांना या आरोपाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. मात्र जे काँग्रेसच्या इशारावर नाचतात त्यांनी डान्स बार वर बोलावं? असाही खोटक टोला शिंदे यांनी अनिल परब यांना नाव न घेता लगावला आहे. तर योगेश कदम यांच्यावर विरोधकांनी केलेले आरोप खोटे असल्याचेही ते म्हणालेत.

Anil Parab Vs Yogesh Kadam
Ramdas Kadam on Uddhav Thackeray : 'शिंदेंना मुख्यमंत्री करायचं ठरलं, अन् इकडं बाप-लेकानं..'; रामदास कदमांनी इतिहास काढला!

FAQs :

1. सावली बार कोणाचा आहे?
– रामदास कदम यांच्या म्हणण्यानुसार, तो बार त्यांच्या कुटुंबाचाच आहे.

2. अनिल परब यांनी नेमके काय आरोप केले होते?
– त्यांनी वाळू चोरी आणि सावली बारबाबत मंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

3. रामदास कदमांनी काय नवं विधान केलं?
– त्यांनी शिंदे गटातील मंत्र्यांना बदनाम करण्यासाठी कट रचल्याचा संशय व्यक्त केला आहे.

4. हे प्रकरण का पुन्हा चर्चेत आलं?
– रामदास कदमांनी खेड येथे भाषणात पुन्हा या मुद्द्यावर भाष्य केल्यामुळे वाद नव्याने उफाळला आहे.

5. अनिल परब यांना 'अर्धवट वकील' का म्हटलं?
– रामदास कदम यांनी परब यांच्यावर टीका करत त्यांच्या वकिली क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com