Sharad Pawar & Teacher agitation Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Teachers Politics: शिक्षकांच्या एकजुटीच्या दबावामुळेच राज्य सरकार झुकले, दिलीप खोडपे यांचा दावा!

NCP Dilip khodpe;The state government bowed to pressure from teachers' unity -राज्य शासनाने साडेसहा हजार अंशतः अनुदानित शाळांच्या शिक्षकांना अनुदान मंजूर करण्याचा निर्णय घेतला.

Sampat Devgire

Dilip khodpe News: राज्यातील विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांना वाढीव टप्पा अनुदान मंजूर करण्यास शासनाची टाळाटाळ सुरू होती. या विरोधात राज्यभरातील शिक्षकांनी मुंबईत आझाद मैदानावर धडक मारली. या शिक्षकांनी रात्रीच्या अंधारातही मैदानावरच ठाण मांडल्याने अखेर सरकारला त्यांच्या मागण्या मान्य करावे लागल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात बुधवारी विधिमंडळाच्या अधिवेशनात याबाबत घोषणा केली. राज्यातील विनाअनुदानित शाळांचे शिक्षक आझाद मैदानावर धरणे आंदोलन करीत होते. विधिमंडळात विरोधी पक्षांनी याकडे शासनाचे लक्ष वेधले होते. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांत चांगलेच आरोप, प्रत्यारोपाचे राजकारण रंगले.

मुंबईत आझाद मैदानावर राज्यभरातील शिक्षकांनी धरणे धरले होते. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी प्रारंभी मुख्यमंत्र्यांच्या वतीने या शिक्षकांची भेट घेतली होती. मात्र लिखित आश्वासन घेतल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे राज्य शासन आणि शिक्षक संघटना यांच्यातील वाद चिघळला होता.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार, आमदार रोहित पवार आणि विविध अन्य पक्षांच्या नेत्यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. शिक्षकांना भर पावसात आणि रात्रीच्या अंधारात मैदानावर आंदोलन करायला लावणे शासनाच्या प्रतिष्ठेला शोभणारे नाही. शिक्षकांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात असा इशारा शरद पवार यांनी दिला होता. त्यानंतर बुधवारी मुख्यमंत्र्यांनी शिक्षकांच्या मागण्या मान्य करीत अनुदान देण्यास तयारी दर्शवली.

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि पूर्वाश्रमीचे शिक्षक दिलीप खोडपे यांनी राज्य शासनाने आजवर शिक्षकांना सातत्याने फसवण्याचा प्रयत्न केला. ही आश्वासन दिले आणि त्यानंतर सत्ता येतात शिक्षकांना धक्का देण्याचे काम केले. मात्र शिक्षक देखील आपल्या मागण्यांवर आणि आंदोलनावर ठाम राहिले.

शिक्षकांना यापुर्वीही राज्य शासनाने आश्वासन दिले होते. मात्र निधीची उपलब्धता केली नव्हती. त्यामुळे शिक्षक आक्रमक झाले होते. आंदोलनाच्य या दबावामुळे राज्य सरकारला शिक्षकांच्या वाढीव टप्पा अनुदानाच्या मागणीला मान्यता द्यावी लागली. हा विरोधी पक्ष आणि शिक्षक एकजुटीचा विजय असल्याचे त्यांनी सांगितले.

--------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT