MLA Jaykumar adressing BJP Morcha
MLA Jaykumar adressing BJP Morcha  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

भाजप नेत्याच्या हत्येनंतर `राष्ट्रवादी`चा गुन्हेगारांना राजाश्रय!

Sampat Devgire

नाशिक : नाशिक शहरात भारतीय जनता पक्षाचे नेते (BJP) अमोल इघे यांचा खून झाला. त्यांनी पोलिसांना सुचीत करूनही पोलिसांनी काहीच केले नाही. खून झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी खासदाराने पोलिसांनी फोन केला. त्यामुळे गुन्हेगारांना राजाश्रय मिळत आहे. हे तातडीने थांबले नाही तर भविष्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपचे नेते जयकुमार रावल (Jaykumar Rawal) यांनी दिला.

शहरातील कायदा व सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्याच्या निषेधार्थ आज शहरात जनआक्रोष मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाच्या समारोप झाल्यावर माजी मंत्री रावल यांनी राज्य सरकारच्या कारभारावर टिका केली. ते म्हणाले, राज्यातील तिघाडी सरकार अपयशी सरकार आहे. राजाश्रयामुळे राज्यात वसुली बोकाळली आहे. राज्याचे माजी गृहमंत्री तुरुंगात आहेत. प्रशासन राजकीय दबावाखाली कामकाज करीत आहे. जनतेचा हा आक्रोश सरकारपर्यत पोहोचविण्यासाठी मोर्चा काढला आहे. अपयशी कामकाज असेच सुरु राहिल्यास याहून तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला.

श्री रावल पुढे म्हणाले की, राज्यात एका पक्षाचा प्रमुख राजकीय स्वार्थासाठी मुख्यमंत्री झाला. हे अभद्र सरकार सत्तेत आल्यापासून अपयशाची मालिका सुरु आहे. ज्यांनी राज्यातील जनतेचे संरक्षण करायला हवे, त्या गृहमंत्र्यांना त्यांच्याच सरकारच्या पोलिस प्रमुखांच्या तक्रारीवरुन तुरुंगात जावे लागले. नाशिकला राजकीय आश्रयामुळे गुन्हेगारी वाढली आहे. सातपूरला भाजपच्या मंडलाध्यक्षाची हत्या झाली. त्यानंतर राष्ट्रवादी कॉग्रेसच्या माजी खासदाराच्या फोन करुन हस्तक्षेप केला. भाजपच्या कार्यालयावर हल्ला झालेले हल्लेखोर मोकाट आहे. सरकारच्या दबावात आधिकारी काम करीत आहे. सामान्य नागरिकांचा आवाज दाबाल तर याहून आधीक तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल. असा इशारा देण्यात आला.

भाजपतर्फे आज गोल्फ क्लब मैदानापासून मोर्चा सुरु झाला. डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ त्याचासमारोप झाला. यावेळी हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लष्करप्रमुख बिपीन रावत यांच्यासह जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी महापौर सतीश कुलकर्णी, शहराध्यक्ष गिरीष पालवे, आमदार देवयानी फरांदे, आमदार सिमा हिरे, आमदार ॲड राहूल ढिकले, माजी आमदार बाळासाहेब सानप, प्रदेश सचिव लक्ष्मण सावजी, विजय साने, रविंद्र अनासपुरे, अरुण पवार, दिनकर आढाव, हिमगौरी आडके आदी पदाधिकारी, नगरसेवक सहभागी झाले.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT