संतप्त भाजप आमदार जयकुमार रावल ‘पीडब्लूडी’वर भडकले

शहादा- दोंडाईचा- सोनगीर रस्त्याचा प्रश्‍न; तीव्र आंदोलनाचा इशारा
BJP leader Jaykumar Rawal
BJP leader Jaykumar Rawalsarkarnama
Published on
Updated on

दोंडाईचा : दरवर्षी पावसाळ्यात रस्ते खराब होतात. त्यामुळे दिवाळीनंतर डागडुजी सुरू होते. त्यात शहादा-दोंडाईचा- सोनगीर या गुजरात आणि महाराष्ट्राला जोडणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्याची स्थिती दयनीय झाली आहे. तरीही डागडुजीकडे लक्ष नाही. रस्त्याचे काम खराब झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (पीडब्लूडी) वेळोवेळी मागणी करूनही दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे. याप्रश्‍नी विभागाला काही संवेदना उरल्या आहेत की नाही, अशी संतप्त भावना माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल (Jaykumar Rawal) यांनी व्यक्त केली.

BJP leader Jaykumar Rawal
भाजप नेत्यांनीच उघड केला धुळ्यातील भ्रष्टाचाराचा धक्कादायक‘जळगाव पॅटर्न’

ते म्हणाले, की दोन वर्षे कोरोनाच्या नावाखाली महाविकास आघाडीने कुठलेच काम केले नाही. राज्यात सर्वत्र रस्त्यांची स्थिती दयनीय झाली आहे. आघाडीचे सरकार आल्यापासून कुठल्याही रस्ते कामासाठी निधी दिलेला नाही. उलट मंत्री पदाच्या काळात जी कामे मंजूर केली आहेत. त्या कामांनाही निधी वितरित होत नाही. परिणामी अनेक विकास कामे ठप्प झाली आहेत. वाहनधारकांना खराब रस्त्यांवर जीव मुठीत घेऊन जावे लागते. पावसाळ्यात रस्ते खराब झाल्यानंतर ते दुरुस्त केले जातात ही अनेक वर्षांची पंरपरा आहे.

BJP leader Jaykumar Rawal
मुका बाप कॅन्‍सरग्रस्‍त मुलासाठी अधिकाऱ्यासमोर हात जोडतो तेव्हा...

आपल्या मतदारसंघातील रस्त्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्याबाबत प्रशासनाला वेळोवेळी सुचना केल्या आहेत. पत्रव्यवहार केला आहे. याविषयी राज्य शासनाने त्याची दखल घेऊन जुने रस्ते दुरुस्त करणे, डागडूजी, नव्या कामांसाठी तरतुद करणे आवश्यक आहे. मात्र गेल्या दोन वर्षात तसे काहीही झाले नसल्याची तक्रार त्यांनी केली.

ते म्हणाले, सध्या नागिरकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यात नादुरुस्त रस्ते ही गंभीर समस्या आहे. त्याबाबत तातडीने पावले टाकण्याची गरज आहे. परंतु, तेही काम आघाडी सरकारकडून होत नसेल तर सार्वजनिक बांधकाम खात्याला केवळ वसुलीचे काम सरकारने दिले आहे का? रस्त्यांची दयनीय स्थिती झाल्यानंतर ते दुरुस्त केले जात नसतील तर खरच या विभागाला जनहिताच्या भावना उरल्या आहेत की नाही, असा संतप्त सवाल प्रश्‍न उपस्थित करत आमदार रावल यांनी मागणी रस्ता लवकर दुरुस्त केला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com