NCP leader Devidas Pingle
NCP leader Devidas Pingle Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

`राष्ट्रवादी`चे नेते देवीदास पिंगळे निर्दोष!

Sampat Devgire

नाशिक : राज्यात भाजपचे (BJP) सरकार कार्यरत असताना झालेल्या विविध राजकीय कारवायांतील बहुचर्चीत प्रकरणातील एक असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) माजी खासदार व बाजार समितीचे माजी सभापती देवीदास पिंगळे (Devidas Pingle) यांची आज निर्दोष मुक्त करण्यात आली.

राजकीय सुडबुद्धीने श्री. पिंगळे यांच्या विरोधात कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची चर्चा होती.

नाशिक बाजार समिती ही राज्यातील सहकार क्षेत्रातील आघाडीची संस्था आहे. या संस्थेचे तत्कालीन सभापती व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार देवीदास पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली ही संस्था कार्यरत होती. यातील काही संचालकांना आमिष दाखवून या संस्थेवर भाजपची सत्ता स्थापन करण्याचे प्रयत्न भाजपच्या नेत्यांनी केला होता, असे बोलले जाते.

बाजार समितीतील कर्नचाऱ्यांच्या वेतनातील वाढीव महागाई भत्ता फरकाची रक्कम अपहार केल्याचा आरोप होता. या खटल्यात सबळ पुराव्याअभावी श्री. पिंगळे यांसह लिपिक दिगंबर चिखले, अकाउटंट अरविंद जैन व सहाय्यक विजय निकम यांची निर्दोष मुक्तता केली.

या प्रकरणात तत्कालीन सभापती देवीदास पिंगळे यांचा संबंध असल्याचा दावा `एसीबी` कडून करण्यात आला होता. त्यात चौकशीला बोलावून व कोणतीही पूर्वसूचना न देता श्री. पिंगळे यांना अटक करण्यात आली. त्यांना सातत्याने जामीन मिळण्यास तपास यंत्रणेने विविध कारणे दिल्याने श्री. पिंगळे साडे तीन महिने कारागृहात होते. त्यानंतर उच्च न्यायायलयाने त्यांना सशर्त जामीन दिला होता.

सहा वर्ष न्यायालयात त्याची सुनावणी सुरु होती. आज जिल्हा सत्र न्यायालयात न्यायाधीश वर्धन देसाई यांनी या खटल्यात श्री. पिंगळे यांची मुक्तता झाली.

मला राजकीय सुडबुद्धीने गोवण्यात आले होते. कितीही त्रास झाला तरी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शरद पवार यांच्यावरील निष्ठा सोडणार नाही याची खात्री झाल्याने राजकीय विरोधकांनी हा कट रचला. त्यात तत्कालीन पालकमंत्र्यांचा अप्रत्यक्ष हात होता असे मला वाटते. मात्र न्यायदेवतेच्या न्यायालयात दुध का दुधव पाणी का पाणी झाले. हा सत्याचा विजय आहे.

- देवीदास पिंगळे, माजी खासदार.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT