Devidas Pingle & Hemant Godse
Devidas Pingle & Hemant Godse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik APMC election : देविदास पिंगळे यांनी आघाडीची घडी बसवली!

Sampat Devgire

Mahavikas Aghadi news : नाशिक बाजार समितीच्या निवडणुकीत माजी खासदार देविदास पिंगळे ठाकरे गटासह काँग्रेसला बरोबर घेत महाविकास आघाडीची घडी बसविण्यात यशस्वी झाले. त्यामुळे त्यांच्या विरोधात पॅनेलची घोषणा केलेल्या शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांना इच्छुकांची मोठी संख्या लक्षात घेता जागा कमी व उमेदवार अधिक असल्याने त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. (Mahavikas Aghadi is benificialfor NCP thi time in APMC election)

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) माजी खासदार देविदास पिंगळे (Devidas Pingle) यांच्या विरोधात गेली पाच वर्षे शिवाजी चुंभळे आणि दिनकर पाटील यांनी सातत्याने रान पेटविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र भारतीय जनता पक्षाला (BJP) माननारे मतदार नाशिक (Nashik) तालुक्यात फारसे नाहीत. त्यामुळे पॅनेल निर्मितीत त्यांच्या पुढे अडचणी येऊ शकतात.

गेल्या निवडणुकीत माजी खासदार पिंगळे यांच्या विरोधात शिवसेनेचे पॅनेल होते. यंदा वरिष्ठ स्तरावर नेत्यांनी महाविकास आघाडीला प्राधान्य देऊन एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे शिवसेनेत फुट पडल्यानंतरही एकनाथ शिंदे गटाला थेट विविध कार्यकारी सोसायटी व ग्रामपंचायत सदस्यांची शिंदे गटात फारसे स्थान नाही. शिवसेनेचे उपनेते बबनराव घोलप, जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी पिंगळे यांच्यासमवेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची घडी बसविण्यात पिंगळे यशस्वी झाले.

माजी खासदार पिंगळे यांच्या विरोधात खासदार गोडसे, माजी सभापती शिवाजी चुंभळे आणि भाजप नेते दिनकर पाटील यांनी एकत्र येऊन पॅनेल निर्मितीची घोषणा केली आहे. अर्थात उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची सर्व पक्षांच्या इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यात प्रभावी उमेदवारांचा शोध व नाकारलेल्यांची नाराजी दुर करण्याचे मोठे आव्हान असेल. त्यामुळे सध्या तरी पॅनेलची जमवा जमव करण्यात माजी खासदार पिंगळे आघाडीवर असल्याचे चित्र आहे.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी ९० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये सहकारी संस्था मतदारसंघात ५०, ग्रामपंचायत मतदारसंघ ३०, तर व्यापारी मतदारसंघातील दहा अर्जांचा समावेश आहे.

दरम्यान, हमाल मापारी गटातून एकही अर्ज आलेला नाही. त्यामुळे आतापर्यंत १८ जागांसाठी एकूण १७५ अर्ज दाखल झाले असून, हमाल मापारी गटातून एकाच उमेदवाराचे तीन अर्ज आलेले आहेत. अर्ज मागे घेण्याची मुदत २० एप्रिलपर्यंत आहे. त्यानंतरच पॅनलनिर्मिती अन्‌ प्रचाराला वेग येणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT