Jalgaon Corporation News : आयुक्तांनी मनपा फंडातून विकासकामे करावीत

भाजप नेते आमदार सुरेश भोळे यांनी पत्रकार परिषदेत महापालिकेला आवाहन केले
BJP Leader Suresh Bhole
BJP Leader Suresh BholeSarkarnama

BJP leader Suresh Bhole news : महापालिका आता कर्जातून मुक्त झाली आहे. आता दर महिन्याला तीन कोटी रुपये महापालिकेला अधिक मिळणार आहेत. त्यामुळे आता शासकीय निधीवरच अवंलबून न राहता आयुक्तांनी महापालिका फंडातून रस्ते व इतर कामे करावीत, असे आवाहन आमदार सुरेश भोळे यांनी केले. (BJP city President Suresh Bhole deemands Development works Of Municiple corporation)

भाजप (BJP) आमदार भोळे (Suresh Bhole) म्हणाले, की महापालिकेच्या (Jalgaon) कर्जमुक्तीसाठी आम्ही प्रयत्न केले. आता महापालिका संपूर्णपणे कर्जमुक्त झाली आहे. त्यामुळे दरमहा तीन कोटी रुपयांचा निधी महापालिकेला मिळणार आहे. आता आयुक्तांनी त्या निधीतून शहरातील विविध भागांतील रस्ते, गटारी आदी कामे करावीत. आता शासनाच्या (Maharashtra Government) निधीवरच अवलंबून राहू नये.

BJP Leader Suresh Bhole
Pachora APMC election News : पाचोऱ्यात लढत बहिन, भावातच!

शहरात रस्त्यांची कामे सुरू आहेत. मात्र, त्यांचा दर्जा उत्कृष्ट नसल्याच्या तक्रारी नागरिकांच्या असल्याचे स्पष्ट करून आमदार भोळे म्हणाले, की रस्त्यांच्या कामांच्या दर्जाबाबत आपणही आयुक्तांना, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले आहे. याप्रकरणी संबंधित मक्तेदारावर कारवाई करावी, असे त्यांना कळविले आहे. त्यांनी त्याची दखल घेऊन कारवाई करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून निधी आणण्याचे काम करतो. मात्र, काम करून घेण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. त्यांनी त्याकडे लक्ष दिले पाहिजे. आता मक्तेदारांनाही वाट सोपी नाही. त्यांना कामांचे पूर्ण पैसे दिले जाणार नाहीत. पाच वर्षांच्या आत रस्ता खराब झाला, तर त्यांनीच पुन्हा काम करून द्यावयाचे आहे. त्यामुळे रस्ता केल्यानंतर पाच वर्षे त्यांचीच जबाबदारी राहणार आहे. त्यामुळे मक्तेदारांनी चांगले काम करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

BJP Leader Suresh Bhole
Khandesh APMC elections : गावित, गिरीष महाजनांची प्रतिष्ठा पणाला!

लवकरच शंभर कोटी येणार

शहराच्या विकासासाठी आम्ही निधी कमी पडू देणार नाही, असे स्पष्ट करून आमदार भोळे म्हणाले, की आम्ही शासनाकडे निधीचे प्रस्ताव दिले असून, त्यासाठी पाठपुरावाही करीत आहोत. लवकरच शंभर कोटी रुपयांचा निधी आम्ही जळगावच्या विकासासाठी आणणार आहोत. येत्या काही दिवसांत हा निधी उपलब्ध होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com