मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उत्तर सभेतील आपल्या भाषणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही एकापाठोपाठ 14 ट्विट करत पवारांवर निशाणा साधला होता. याचा समाचार राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी खुद्द शरद पवारांच्याच उपस्थितीत घेतला आहे. (Eknath Khadse on Dilip Walse-Patil)
शरद पवारांच्या घरावर झालेला हल्ला, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर होणारी 'ईडी'ची कारवाई, याला पवारांच्या उपस्थितीतच खडसेंनी उत्तर दिले. त्यांनी भाजप आणि फडणवीसांवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, गेल्या वर्षी दोन -चार जणांना आत टाकलं असतं तर ही परिस्थिती उद्भवली नसती. दिलीप वळसे पाटलांनी गृहमंत्रिपदाचा हिसका, इंगा दाखवावा. माझेच पाय धरणारे हात-बोट धरणारे पोरं आज मला शिकवायला लागलेत आणि पवार साहेबांवर बोलायला लागले, याचं मला आश्चर्य वाटतंय.
राज ठाकरे यांच्या पवारांवरील टीकेनंतर राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. त्यातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी फडणवीस यांनी पवारांच्या भूमिकांबाबत 14 ट्विट करत टीका केली होती. फडणवीस यांनी पहिल्या ट्विटमध्ये जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर पवारांनी मांडलेल्या भूमिकेवरून टीका केली आहे. एका बाजूला आपला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी आहोत. त्यांचा कलम 370 ला विरोध होता. पण आंबेडकरांच्या तत्वांविरोधात काय बोलले जातेय ते पहा, असं ट्विट करत फडणवीस यांनी त्यासोबत कलम 370 हटवल्यानंतर पवारांनी त्यावर दिलेल्या प्रतिक्रियेचे वृत्त जोडले आहे.
दुसऱ्या ट्विटमध्ये फडणवीसांनी काश्मीर फाईल्स या चित्रपटाचा मुद्दा उपस्थित केला होता. नवाब मलिक मुस्लिम असल्याने त्यांचा दाऊद इब्राहिमशी संबंध जोडला जात असल्याचं वक्तव्य शरद पवारांनी केलं होतं. त्यावरून फडणवीस यांनी तिसरं ट्विट केलं होतं. चौथ्या ट्विटमध्ये इशरत जहाँ निर्दोष असल्याचं पवारांचं वक्तव्य असलेली बातमी होती. पाचवं ट्विटही इशरत जहाँबाबतच होतं. रझा अकादमीबाबत मवाळ भूमिका घेत मुंबईच्या पोलिस आयुक्तांना हटवल्याचं फडणवीसांनी सहाव्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
सातव्या ट्विटमध्ये फडणवीस यांनी महाराष्ट्रातील मुस्लिम आरक्षणाचा उल्लेख केला होता. तर आठव्या ट्विटमध्ये अल्पसंख्यांक भाजपला मतं देत नाहीत, या पवारांच्या वक्तव्याची बातमी ट्विट केली होती. नवव्या ट्विटमध्ये हिंदू दहशतवादाचा पवारांनी केलेला उल्लेख, दहाव्या ट्विटमध्ये सच्चर कमिटीच्या अहवालाच्या अंमलबजावणीबाबतची पवारांची भूमिका असलेल्या बातम्या ट्विट करण्यात आल्या होत्या. फडणवीस यांनी अकराव्या ट्विटमध्ये मुंबईत 1993 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटावरून निशाणा साधला आहे. तर बाराव्या आणि तेराव्या ट्विटमध्ये त्यांनी पवारांच्या काश्मीर फाईल्सविरूध्दच्या भूमिकावरून टीकेचा बाण सोडला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.