Eknath Khadse and Devendra Fadnavis  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

एकनाथ खडसे म्हणाले, मी टरबुज्या म्हणणार नाही पण...

एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांची काही नेत्यांबद्दलची नाराजी कमी झालेली नाही.

सरकारनामा ब्युरो

जळगाव : भाजप (BJP) सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) गेल्यानंतरही ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांची काही नेत्यांबद्दलची नाराजी कमी झालेली नाही. विशेषत: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devndra Fadnavis) यांच्यावर ते सातत्याने निशाणा साधत असतात. खडसेंनी आज पुन्हा एकदा भाजप आणि फडणवीसांवर तोफ डागली. त्यामुळे पुन्हा एकदा खडसे विरुद्ध भाजप नेते असे शाब्दिक युद्ध सुरू होण्याची चिन्हे आहेत.

जळगावमध्ये एका जाहीर कार्यक्रमात बोलताना खडसेंनी फडणवीसांवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, भाजपमध्ये मी 40 वर्षे हमाली केली. पक्षासाठी मी उभे आयुष्य खर्ची घातले. एवढे केल्यानंतर मी मुख्यमंत्रिपदापर्यंत पोचलो आणि त्याचवेळी पक्षाने मी टरबुज्या म्हणणार नाही पण माझ्या डोक्यावर देवेंद्र फडणवीस आणून ठेवला. मला पक्षाने मुख्यमंत्री पदापासून डावलले. मुख्यमंत्रिपदाचा अधिकार हा खानदेशाचा होता. स्वांतत्र्य मिळून 70 वर्षे उलटल्यानंतरही खानदेशावर अन्याय झाला.

भाजपने मुख्यमंत्री पदापासून डावलल्याची खदखद व्यक्त करीत खडसे म्हणाले की, मागील 70 वर्षांत कोकणातील नारायण राणे, मनोहर जोशी यांच्यासह तीन मुख्यमंत्री झाले आहेत. विदर्भातील आधी चार मुख्यमंत्री झाले होते आणि देवेंद्र फडणवीसच्या रुपाने पाचवा मुख्यमंत्री झाला. मराठवाड्यातील विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, शिवाजीराव निलंगेकर यांच्यासह चार मुख्यमंत्री झाले.

मुख्यमंत्रिपदाबाबत खानदेशावर आतापर्यंत अन्याय झाला आहे, असे सांगून खडसे म्हणाले की, नाशिक, नगर, धुळे, नंदूरबार या जिल्ह्यांतील एकही मुख्यमंत्री आतापर्यंत झालेला नाही, उत्तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदावर अधिकार असतानाही डावलण्यात आले. आम्ही 40 वर्षे पक्षाची हमाली केली होती. तरीही मला अधिकार असताना डावलले. हा माझा नाही तर उत्तर महाराष्ट्राचा अपमान आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT