मोठी बातमी : नाना पटोलेंच्या जावयाच्या भावासह व्याही अडकले; फसवणुकीचा गुन्हा दाखल

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या जावयाचे भाऊ आणि व्याह्यांवर फसवणुकीच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे.
Nana Patole
Nana Patole Sarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : कंपनीचा बनावट सही-शिक्का वापरून व्यावसायिक आणि न्यायालयाची फसवणूक केल्याप्रकरणी पिंपरी (Pimpari) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या जावयाचे भाऊ रोहित काळभोर (Rohit Kalbhor) आणि व्याही शंकर काळभोर (Shankar Kalbhor) यांचा समावेश आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी पवन मनोहरलाल लोढा (वय 24, रा. नितेश कुंज, सेक्टर 24, निगडी प्राधिकरण) यांनी तक्रार दिली आहे. हा प्रकार 4 डिसेंबर 2017 ते 28 मार्च 2019 या काळात घडला होता. रोहित शंकर काळभोर (वय 35) आणि शंकर नामदेव काळभोर (वय 58, दोघेही रा. जैन मंदिर रोड, मदनलाल धिंग्रा मैदानाजवळ प्राधिकरण) या बापलेकांवर गुन्हा दाखल झाला आहे. लोढा यांनी न्यायालयात या प्रकरणी तक्रार अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने या अर्जाची दखल घेऊन पोलिसांना गुन्हा दाखल करून तपासाचे आदेश दिले आहेत.

Nana Patole
निवडणुकीच्या मुहूर्तावर तुरुंगातून बाहेर आलेल्या बाबा राम रहीमने 24 तास आधी खोलले पत्ते

लोढा यांची खराबवाडी चाकण येथे एक्साय अँलईज नावाची कंपनी आहे. या कंपनीत भंगार मालापासून अॅल्युमिनियमचे सळया, पत्रे बनवले जातात. त्यांना रोहित काळभोर यांच्या कोहिनूर ट्रेड होम या कंपनीकडून अॅल्युमिनियमच्या भंगाल मालाचा पुरवठा केला होता. याचे पैसे लोढा यांनी काळभोर यांना दिले होते. या मालाच्या पुरवठ्यासाठी रोहित काळभोर यांनी हमी म्हणून धनादेश घेतले होते. लोढा यांनी काळभोर यांना 10 लाख रुपयांचे 7 आणि 8 लाख 92 हजार 658 रुपयांचा एक असे 8 धनादेश दिले होते. या धनादेशांची एकूण रक्कम 78 लाख 92 हजार 658 रुपये होती. हे धनादेश काळभोर यांच्या कोहिनूर कंपनीच्या नावाने देण्यात आले होते. लोढा यांनी मालाचे सगळे पैसे दिले असतानाही काळभोर बापलेकांनी धनादेशांचा गैरवापर करून ते बँकेत भरले.

Nana Patole
दरेकरांच्या गाडीला महिन्यात तिसऱ्यांदा अपघात अन् पडळकर म्हणाले...

दरम्यान, धनादेशांच्या गैरवापर होण्याची शक्यता असल्याने लोढा यांनी आधीत कॉसमॉस बँकेच्या भोसरी शाखेत धनादेशांचे पेमेंट थांबवण्यास सांगितले होते. त्यामुळे आरोपींनी भरलेले धनादेश बँकेत वटले नाहीत. यानंतर आरोपींनी फिर्यादीला वकिलामार्फत नोटीस पाठवली होती. त्यांनी पिंपरी न्यायालयात फिर्यादी आणि त्यांच्या कंपनीच्या संचालकांविरुद्ध फौजदारी दावा दाखल केला होता. हा खटला दाखल करताना आरोपींनी फिर्यादीच्या सहीचा आणि त्यांच्या कंपनीच्या बनावट शिक्क्यांचा वापर केला होता. नंतर ही कागदपत्रे पडताळणीसाठी पाठवण्यात आली होती. त्यात सही आणि शिक्के बनावट असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे अखेर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com