NCP leader Kunal Padvi
NCP leader Kunal Padvi 
उत्तर महाराष्ट्र

NCP News; निकृष्ट रस्ता केल्याने राष्ट्रवादीने प्रशासनाला धारेवर धरले!

Sampat Devgire

तळोदा : तळोदा (Nandurbar) तालुक्यातील खरवड ते बोरद या रस्त्याचे (Roads) काम गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात येत असून या कामासाठी आदिवासी विकास विभागाकडून (Trible) विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे. मात्र सदर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) शहादा-तळोदा विधानसभा अध्यक्ष कुणाल पाडवी (Kunal Padvi) यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक-२ चे अभियंता (PWD) नितीन वसावे यांच्याकडे तक्रार केली आहे. तसेच, या रस्त्याची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली. (NCP leader Kunal Padvi deemand inquiry of Taloda road infirior quality constrution)

या रस्त्यासाठी आदिवासी विकासासाठीचा निधी वापरण्यात आला. मात्र हे काम अत्यंत निकृष्ठ झाले आहे. त्यामुळे हा निधी वाया गेला. त्याचा आदिवासी परिसरातील नागरिकांना मोठा त्रास होत आहे. याबाबत चौकशी करून संबंधीतांवर कारवाईची मागणी करण्यात आली.

निवेदनात म्हटले आहे, की खरवड ते बोरद हा ३ हजार ४०० मीटर रस्ता आदिवासी विकास विभागाच्या विशेष निधीतून मंजूर करण्यात आला असून हा निधी देखील या कामासाठी वर्ग करण्यात आला आहे. या रस्त्याच्या कामासाठी साधारणतः ४२ लाखापर्यंत निधी प्राप्त झाला आहे. या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत नियुक्त संबंधित ठेकेदाराकडून होत आहे. मात्र, बांधकाम विभागाच्या कार्यालयाकडून घालून देण्यात आलेल्या निकषानुसार हे काम होताना दिसून येत नाही. बोरद पासून काही अंतर पुढे गेल्यावर हा रस्ता आधी चांगल्या अवस्थेत होता, त्यामुळे या रस्त्याच्या त्याठिकाणी खर्च करण्याची आवश्यकता नव्हती. तोच खर्च वाचवून संबंधित ठेकेदाराने हा रस्ता उच्च प्रतीचा बनवला असता तर या रस्त्याचे काम अधिक चांगले झाले असते. मात्र संबंधित ठेकेदाराने रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केले असल्याचे दिसून येत आहे.

रस्त्यावरील साईड पट्ट्याही मुरुम न टाकता मातीनेच भरल्या जात आहेत. त्यामुळे या रस्त्याच्या कामाची चौकशी करण्यात यावी असे तक्रारीत नमूद केले आहे. ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेसचे शहादा-तळोदा विधानसभा अध्यक्ष कुणाल पाडवी यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक-२ चे अभियंता नितीन वसावे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT