धुळे : (Dhule) महापालिकेसह सत्ताधारी भाजपकडून (BJP) १५४ कोटींच्या पाणीपुरवठा (Water) योजनेचा गाजावाजा करण्यात आला. प्रत्यक्षात या योजनेचे काम अद्याप अपूर्ण असून शेकडो किलोमीटर अंथरलेली पाइपलाइन, तसेच नव्याने उभारलेले जलकुंभ जलसाठ्या वाचून तहानलेलेच आहेत. परिणामी, जलकुंभाला तडे जात आहेत. ही स्थिती का, असा प्रश्न उपस्थित करत शिवसेनेच्या (Shivsena) ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) महापालिकेसह भाजपवर आरोपांचा वार करत जलकुंभावर शनिवारी आंदोलन केले. (Shivsena Questioned BJP on Water issue of Dhule city)
धुळे शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. याबाबत सातत्याने नागरिकांची ओरड आहे. त्यावर महापालिकेतील सत्ताधारी भाजपने गाजावाजा करीत 154 कोटी रुपयांची पाणी योजना राबवली. प्रत्यक्षात मात्र ही योजना धुळखात पडली. नागरिकांना पाणी मिळाले नाही. मग 154 कोटींचा खर्च कुठे झाला, या पैशाचा हिशेब देण्याची मागणी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने केली आहे.
शहराला तापी पाणीपुरवठा, डेडरगाव तलाव, नकाणे तलाव, हरण्यामाळ तलाव, पांझरा नदीतून थेट पाणी उचलून पुरवठा केला जातो. तरीही आठवड्यानंतर पाणीपुरवठा होत असल्याने शहर तहानलेलेच असते. शहराला रोज पाणीपुरवठा करण्यात अडचणी येतात. सध्या चार ते पाच, तर काही ठिकाणी आठ ते दहा दिवसांआड पाणीपुरवठा होतो. तोही कमी दाबाने होतो. लोकप्रतिनिधींकडून रोज पाणीपुरवठ्याबाबत वल्गना केल्या जातात. केवळ नियोजनाअभावी मुबलक पाणी असूनही पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर ठरला आहे.
शहरात १५४ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना गैरकारभाराच्या गाळात रुतली असून यात ओव्हरसियर, अधिकारी, लोकप्रतिनिधींनी आपले उखळ पांढरे करून घेतल्याचा आरोप आहे. त्यामुळे सलग अकराव्यादिवशी या योजनेतील गैरकारभाराविरोधात घोषणाबाजी करत फॉरेस्ट कॉलनीतील पं. हरिवंशराय बच्चन जलकुंभावर आंदोलन केले. तीन वर्षांपासून नवे जलकुंभ भरलेच गेले नाहीत. त्यामुळे कोट्यवधींचा निधी पाण्यात जात आहे, असा आरोप करत या योजनेची चौकशी व्हावी व दोषींवर कारवाईची मागणी आंदोलक जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, माजी आमदार प्रा. शरद पाटील, महानगरप्रमुख डॉ. सुशील महाजन, धीरज पाटील, संघटक देवीदास लोणारी, राजेश पटवारी, ललित माळी, भरत मोरे, संदीप सूर्यवंशी, मच्छिंद्र निकम, विनोद जगताप, महादू गवळी, संजय जवराज, प्रवीण साळवे, छोटू माळी, कैलास मराठे, हिमांशू परदेशी, पंकज भारस्कर आदींनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.