Sunetra Pawar, Supriya Sule & Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal : रोज विलिनीकरण, विलिनीकरण काय लावले? भुजबळ संतापले, म्हणाले इतकी घाई..

Chhagan Bhujbal On NCP merger : दररोज विलिनीकरणाची चर्चा कशासाठी, एवढी घाई करण्याचे कारण काय? असा सवाल मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थितीत केला आहे. पहिल्या दिवसापासून विलिनीकरण विलिनीकरण सुरु आहे.

Ganesh Sonawane

Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. यासंदर्भात बोलताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व मंत्री छगन भुजबळ म्हणाले, मला हे कळत नाही रोज विलिनीकरण, विलिनीकरण काय ही चर्चा आहे. विलीनीकरण आजही करता येईल, एक महिन्याने, दोन महिन्याने कधीही करता येईल. इतकी घाई कशासाठी, इतकी घाई करण्याचं कारण काय? असा सवाल भुजबळांनी उपस्थितीत केला आहे.

नाशिक मध्ये भुजबळांची पत्रकारपरिषद झाली त्यावेळी त्यांनी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर आपली भूमिका मांडली. भुजबळ म्हणाले, सुनेत्रा पवार या आता तिथे राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून बसलेल्या आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुद्दा आम्ही त्यांची निवड करणार आहोत. त्यानंतर त्या पक्षाचे जे काही प्रमुख लोक आहेत तसेच त्यांना ज्यांना बोलवावे वाटत असेल त्यांना बोलावून घेतील. चर्चा होईल, शेवटी एवढा मोठा निर्णय आहे तो दोन्ही बाजुच्या लोकांनी चर्चा करुनच होईल असे भुजबळांनी अधोरेखित केले.

त्यामुळे विलीनीकरणाबाबत एवढी घाई करण्याचे कारण नाही. परंतु आज ते ठरलच होतं, झालच पाहीजे हे म्हणण्यात काहीच अर्थ नाही. आता नवीन कॅप्टन आल्या आहेत. त्यांना बसू द्या, काम करु द्या. समजून घेऊ द्या. नंतर मग बघतील त्या काय करायचे ते. आज आमच्यासमोर हा विषयी खरोखरच नाही. असं भुजबळांनी स्पष्टच सांगितलं.

भुजबळ पुढे म्हणाले, आज सुनेत्रा पवार यांनी आपल्या उपमुख्यमंत्री पदावर स्थिरस्थावर होणं तसेच त्यांची राष्ट्रीय अध्यक्ष पदी निवड करुन घेणं हा माझ्यासमोरचा प्राथमिक अजेंडा आहे. सुनेत्रा पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याचा निर्णय ठरला का? असा सवाल पत्रकारांनी उपस्थितीत करताच भुजबळ म्हणाले, शंभर टक्के. संपला विषय..

दरम्यान आपल्या पक्षातले काही आमदार विलिनीकरणाबद्दल मत व्यक्त करत आहेत त्यांचे काय असे विचारले असता भुजबळ म्हणाले, हे मोघमपणे बोलण्यात काही अर्थ नाही. आता आपण नवीन कॅप्टन नेमले आहेत ना, मग ते बघतील ना, विचार करतील ना ते..आमदारांची ते मीटिंग घेतील. आता हा म्हणतो म्हणून तो म्हणतो..तो म्हणतो म्हणून हा म्हणतो...एवढी घाई का करायची ? असा संतप्त सवाल भुजबळांनी केला.

तीन-चार दिवसात शपथविधी घेतला तर फार घाई केली असे म्हणाले. मग, पहिल्या दिवसापासून विलिनीकरण विलिनीकरण सुरु आहे मग ती घाई नाही का? रोज तीच,तीच बातमी जरा थांबूया आपण असं भुजबळ म्हणाले.

शरद पवारांना फोन

सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी आधी शरद पवारांना फोन केला होता, अशी माहिती समोर येतेय. यावर विचारले असता भुजबळ म्हणाले, फोन केला होता की नाही मला माहित नाही. पण जय, पार्थ तिथे जाऊन पवार कुटुंबियांना भेटून आले. ते सर्व टीव्हीवर चाललं, सगळ्यांनी पाहिलं असं भुजबळ म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT