Narhari Zirwal : आता झिरवाळांच्याच मागे विरोधकांचा सापळा, राजीनाम्याची मागणी करत पडले तुटून

Narhari Zirwal ACB bribery case : नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयात गुरुवारी एसीबीने सापळा लावला होता. झिरवाळांच्या कार्यालयातील लिपीक ३५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ एसीबीला सापडला.
Narhari Zirwal ,Harshvardhan Sapkal, Sanjay Raut
Narhari Zirwal ,Harshvardhan Sapkal, Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : राष्ट्रवादीचे नेते अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील दुसऱ्या मजल्यावरील कार्यालयात एसीबीने कारवाई करत झिरवाळ यांचा कारकून राजू ढेरिंगे याला ३५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. मंत्र्याच्या दालनातच हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, या लाचखोरीची पाळेमुळे जर माझ्यापर्यंत आली तर निश्चितच मी राजीनामा देईल असे काल झिरवाळ यांनी म्हटले होते.

मात्र, आज सकाळपासून मंत्री नरहरी झिरवाळ हे नॉटरिचेबल असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे नरहरी झिरवाळ यांच्या विभागातील लाचखोर लिपीक राजू संपत ढिरेंगे याला विशेष सत्र न्यायालयाने १६ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. एका मेडिकलचा निलंबित परवाना पुन्हा पूर्ववत करुन देण्यासाठी त्याने 50 हजाराच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 35 हजाराची लाच घेताना तो रंगेहात सापडला.

असे असताना विरोधकांनी मात्र या प्रकरणावरुन झिरवाळ यांना चारही बाजूंनी घेरले असून त्यांनी जबाबदारी स्विकारत राजीनामा द्यावा अशी मागणी लावून धरली आहे. या घटनेमुळे भाजप महायुती सरकारच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली असून या लाचखोरीची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी मंत्री झिरवाळ यांनी तत्काळ मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी कालच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

Narhari Zirwal ,Harshvardhan Sapkal, Sanjay Raut
Narhari Zirwal : धक्कादायक ! मंत्री नरहरी झिरवाळ यांचे मंत्रालयातील कार्यालय सील, अडचणी वाढण्याची चिन्हे; नेमकं काय झालं?

झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिकाने वरिष्ठांच्या सांगण्यावरून लाच घेतल्याचे एसीबीच्या अधिकाऱ्यांना सांगितल्याची माहिती समोर येत आहे. हे आणखी धक्कादायक आणि गंभीर बाब आहे. त्यामुळे झिरवाळ यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. निष्पक्ष चौकशीसाठी झिरवाळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. जनतेची कामे पैशाशिवाय होत नाही अशी स्थिती असून ही अत्यंत गंभीर बाब असून, मुख्यमंत्र्यांनी संबंधित प्रकरणाची जनतेला माहिती द्यावी आणि लाचखोर मंत्र्याला पदावरून हटवावे अशी मागणी करत हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी शनिवार माध्यमांशी बोलताना नैतिकतेच्या आधारावर नरहरी झिरवाळ यांनी राजीनामा दिला पाहीजे अशी मागणी केली आहे. झिरवाळांचे कार्यालय एसीबीने सील केले आहे, यासारखी लाजीरवाणी गोष्ट नाही. झिरवाळ काय आहेत हे सर्वांना माहिती आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाशिवाय मंत्रालयात अशी कारवाई होऊ शकत नाही. याचा अर्थ हाच की, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाचे मंत्रालयातील लाचखोरीवर लक्ष होते आणि लाचखोरीचा अतिरेक झाला तेव्हा ही कारवाई करण्यात आली.

Narhari Zirwal ,Harshvardhan Sapkal, Sanjay Raut
Narhari Zirwal : धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटेंनंतर राष्ट्रवादीचा तिसरा मंत्री अडचणीत : नरहरी झिरवाळांकडून थेट राजीनाम्याचीच तयारी

नरहरी झिरवाळ यांचे खाते हे सर्वसामान्य लोकांच्या जीवनाशी संबधित आहे. त्या खात्यात किती अनागोंदी आणि अराज माजले होते हे झिरवाळांचे चारित्र्य माहिती असलेल्यांना सांगायची गरज नाही. हे झिरवाळ उपाध्यक्ष असताना पक्षांतर बंदी कायद्या संदर्भातील विषय त्यांच्यासमोर आले होते आणि पडद्यामागे काय घडले हे देखील आम्हाला माहिती असल्याचे राऊत म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com