MLA Ashutosh Kale Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

MLA Ashutosh Kale : आमदार आशुतोष काळेंचा विरोधकांच्या राजकीय दुकानदारीवर हल्लाबोल

Pradeep Pendhare

Ahmednagar News : कोपरगावमधील पाच नंबर साठवण तलावाच्या जलपुजनावेळी आमदार आशुतोष काळे विरोधकांच्या राजकारणावर चांगलेच कडाडले. या भूमिपुजनाच्या कार्यक्रमातून विरोधकांना आव्हान देण्याबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार शक्तिप्रदर्शन करत रणशिंग फुंकले.

'कोपरगावच्या विकासाला आडवे येणाऱ्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत गाडू टाका', असा टोला आमदार काळेंनी लगावला.

विधानसभा 2019 च्या निवडणुकीत आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगावमधील पाच नंबर साठवण तलाव पूर्ण करणार असल्याची घोषणा केली होती. या तलावाच्या जलपुजन त्यांच्याच हस्ते झालं. यावेळी ते विरोधकांच्या खुज्या राजकारणावर टीका केली. 'हा साठवण तलाव होऊ नये यासाठी एक नव्हे, तर न्यायालयात वेगवेगळ्या आठ याचिका दाखल केल्या होत्या', असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळेंनी विरोधकांवर केला.

आशुतोष काळे म्हणाले, "कोपरगावचा पाणीप्रश्न सुटला, तर राजकारण कशावर करायचे. आपली राजकीय दुकानदारी संपुष्टात येऊ नये यासाठी पाच नंबर साठवण तलावाविरोधात न्यायालयात एक नव्हे, तर आठ याचिका दाखल केल्या होत्या. अफवा पसरविल्या, अडथळे आणले, मात्र या सर्वांवर आपण पुरून उरलो". या सर्वावर मात करून आज कोपरगावकरांसाठी जलपुजन करतानाचा आनंद होत असल्याचं आमदार काळे यांनी म्हटलं.

'राजकारण कुठं करावं हे विरोधकांना कळत नाही, त्यामुळे त्यांच्यापासून कोपरगांवकर दूर गेलाय, असं सांगताना, या साठवण तलावाचे मटेरिअल, समृद्धी महामार्गासाठी वापरत असताना, विरोधकांनी तिथं देखील राजकारण केलं. तलावाला 134 कोटींची निधी मंजूर झाल्यानंतर, यासाठी कोपरगाव नगरपरिषदेला 15 टक्के रक्कम भरायची होती. ती भरता येणार नाही, अशा अफवा पसरवल्या गेल्या. नेते उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडून ही रक्कम देखील माफ करून आणली. यामुळं कोपरगांवकरांचे जवळपास 20 कोटी रुपये वाचले. विरोधकांना तोंडघशी पाडलं', असंही आमदार आशुतोष काळे यांनी सांगितलं.

विकासाचं राजकारणच होणार

विरोधकांच्या चुकीच्या धोरणावर आमदार आशुतोष काळे यांनी हल्लाबोल केला. 'विरोधकांच्या कार्यकाळातील काम पाहिल्यावर जलतरण तलाव कुठं आहे. संगमनेर बसस्थानकाच्या धर्तीवर शाॅपिंग काम्प्लेक्स बांधून, बाजरपेठेला चालना मिळाली असती. परंतु बसस्थानक देखील चुकीचं बांधून ठेवलं. क्रीडा संकुलाचा शहराला उपयोग होत नाही. पण आता कोपरगावचा विकास कोणीही थांबू शकत नाही, विकासाचं राजकारणच कोपरगावमध्ये होणार', असं आमदार आशुतोष काळे यांनी म्हटलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT