Ajit Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

NCP Politics: राष्ट्रवादीच्या आमदाराने दिला थेट राजीनाम्याचा इशारा... काय आहे प्रकरण?

Ajit Pawar Hiraman Khoskar Igatpuri Constituency Water Issue : आमदार हिरामण खोसकर सध्या मतदारसंघातील नागरिकांसाठी आक्रमक आहेत.

Sampat Devgire

Nashik News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार हिरामण खोसकर मतदारसंघातील मतदारांच्या अडचणींसाठी आक्रमक झाले आहेत. मतदारसंघातील धरणांचे पाणी अन्य जिल्ह्यांना दिले जाते. मात्र मतदारसंघातील आदिवासी आणि शेतकरी शासनाच्या उदासीनतेमुळे उपेक्षित राहतात, अशी नाराजी खोसकर यांनी व्यक्त केली आहे.

आता खोसकर यांनी राज्य शासनाला निर्वाणीचा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे या प्रश्नावर ते ठाम आहेत. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना त्यांनी मतदारसंघातील भावली धरणाच्या पाण्यासाठी साकडे घातले आहे. इगतपुरीच्या भावली धरणाचे पाणी शहापूर तालुक्याला देण्याचा घाट घालण्यात आला आहे.

मतदारसंघातील शेतकरी पाण्यासाठी त्रस्त आहेत. आदिवासींना शेतीसाठी अनेक वर्ष पाण्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. त्यांच्याविषयी जलसंपदा विभागाकडून उपेक्षा केली जाते. हा आमदार खोसकर यांचा संताप आहे. इगतपुरी तालुक्यातील धरणांचे पाणी शहापूरला दिल्यास प्रसंगी आमदारकीचा राजीनामाच देऊ, असा थेट इशाराच त्यांनी दिला आहे.

नुकत्याच झालेल्या निवडणुकीनंतर अद्याप आमदारांनी कार्यभार स्वीकारल्यावर अशी वेळ आल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे. या संदर्भात त्यांनी विधिमंडळात देखील आवाज उठवला होता. विधिमंडळात भावली धरणाचे पाणी अन्य जिल्ह्यांना देण्यात त्यांनी तीव्र विरोध केला होता. याबाबत त्यांनी जलसंपदा विभागासह संबंधित मंत्र्यांशी पत्रव्यवहार केला आहे.

अधिवेशन संपल्यानंतर सध्या ते मतदारसंघात आले आहेत आपल्या त्या मागणीसाठी आपण ठाम असून राज्य शासनाने भावली धरणाचे पाणी अन्य जिल्ह्यांना दिल्यास आपण राजीनामा देऊ यावर ठाम आहोत, असा दावा त्यांनी केला आहे. काँग्रेस पक्षाचे आमदार म्हणून ते 2019 ला निवडून आले होते. त्यांच्यावर क्रॉस वोटिंग चा आरोप करण्यात आला. काँग्रेस पक्षातील अंतर्गत विसंवादातून त्यांनी पक्षाला रामराम ठोकला होता.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यावर त्यांनी इगतपुरी मतदारसंघातून उमेदवारी केली. ते दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. निवडणुकीचा निकाल लागून महिनाही झाला नाही, तोच त्यांनी थेट पक्ष नेत्यांना आणि सरकारला राजीनाम्याचा इशारा दिल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT