Supreme Court Decision : 'ED' ची ईडा पीडा टळणार? सुप्रीम कोर्टाने अधिकारांना लावली कात्री

Supreme Court Decision ED can not Access Digital Devices : सुप्रीम कोर्टाने ईडी म्हणजेच अंमलबजावणी संचालनालयाचे हात बांधले आहेत. वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये सतत ईडीची चर्चा होत असते. सुप्रीम कोर्टाने ईडीचे हात बांधले आहेत.
Supreme Court Decision on ED Officer
Supreme Court Decision on ED OfficerSarkarnama
Published on
Updated on

सुप्रीम कोर्टाने ईडी म्हणजेच अंमलबजावणी संचालनालयाचे हात बांधले आहेत. वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये सतत ईडीची चर्चा होत असते. आतापर्यंत वेगवगेळ्या नेत्यांना किंवा उद्योगपतींना ईडीच्या चौकशीला सामोरं जावं लागलं आहे. पण आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार ईडी (ED) अधिकारी मोबाईल आणि लॅपटॅाप तपासू शकणार नाही. त्याचबरोबर संशयिताचा मोबाईल, लॅपटॅापचा ॲक्सेसही घेता येणार नाही शिवाय डेटा कॅापी करता येणार नाही.

छापा टाकल्यानंतर संशयिताच्या खाजगी वस्तूंना हात लावता येणार नाही. नोव्हेंबरमध्ये “लॉटरी किंग” सँटियागो मार्टिन (Santiago Martin Case) त्याचे नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांवर ईडीने धाडी टाकल्या होत्या. या प्रकरणात कोर्टाने हा आदेश दिला आहे. या आदेशात विशेष करून इलेक्ट्रॅानिक वस्तू ताब्यात घेता येणार नसल्याचं न्यायालयाने (Supreme Court) सांगितले आहे. झडतीदरम्यान जप्त केलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून सामग्रीची कॉपी करण्यास मनाई करण्यात आली आहे.

Supreme Court Decision on ED Officer
New Governor Manipur : मागणी मुख्यमंत्री बदलाची, दिले नवे राज्यपाल; मणिपूरची जबाबदारी निवृत्त गृह सचिवांवर

ईडीची कारवाई आणि सर्वोच्च न्यायालयाची भूमिका

छापेमारी दरम्यान ईडीने (ED) 12.41 कोटी रुपयांची रोकड जप्त केली होती. या प्रकरणाचा तपास करत असताना 'ईडी'ने 6 राज्यांतील 22 ठिकाणी छापे टाकून 'लॉटरी किंग सँटियागो मार्टिन'चे नातेवाईक आणि जवळच्या मित्रांकडून अनेक प्रकारची इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली होती.

Supreme Court Decision on ED Officer
Devendra Fadnavis : काँग्रेसला CM फडणवीसांनी धू धू धुतले; म्हणाले, 'मोदी अन् शाह स्वप्नात...' पाहा VIDEO

न्यायमूर्ती अभय एस ओका आणि पंकज मित्तल यांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने 13 डिसेंबर रोजी दिलेल्या आदेशात ईडीला सँटियागो मार्टिन आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून डेटा काढण्यास आणि कॉपी करण्यास प्रतिबंध केला आहे. वैयक्तिक डेटासाठी समन्स जारी करण्यासही न्यायालयाने ईडीला बंदी घातली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com