MLA Rohit Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

MLA Rohit Pawar : रोहित पवारांना मोठा धक्का; 'या' नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

सरकारनामा ब्यूरो

ओंकार दळवी :

Ahmednagar News: जामखेड नगरपरिषदेचे माजी नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पवन महादेव राळेभात यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आमदार रोहित पवार यांना जामखेडमध्ये मोठा धक्का बसला आहे. (MLA Rohit Pawar and Pawan Ralebhat Jamkhed Politics)

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस सोडून जाणाऱ्यांची संख्या वाढल्याने आमदार रोहित पवार यांना आत्मचिंतन करण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रत्येक स्थानिक नेता आपापल्या परीने राजकारण करत असल्याने या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व काय राहणार, याबद्दल चर्चा होऊ लागल्या आहेत. उलट सत्ता नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला 'घर फिरले की घराचे वासेही फिरतात', याचा सध्या अनुभव येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पवन राळेभात यांनी जामखेड नगरपरिषदेची निवडणूक शिवसेनेच्या चिन्हावर लढवून जिंकली होती. त्यानंतर ते आमदार रोहित पवार यांच्या खांद्याला खांदा लावून जामखेड शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला उभारी देण्याचे काम करत होते. शांत संयमी व्यक्तिमत्त्व म्हणून ते शहरात चांगले परिचित आहेत.

गेल्या अनेक महिन्यांपासून जामखेड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला मरगळ आली आहे. आमदार रोहित पवार हे कार्यकर्त्यांकडे लक्ष देत नसल्याचे कारण सांगून अनेक जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसला जामखेड तालुक्यात सत्ता गेल्यानंतर घरघर लागली असल्याचे पाहायला मिळत आहे.

अनेक कार्यकर्ते उघडपणे आमदार रोहित पवार यांच्यावर नाराजी व्यक्त करत पक्षाच्या कार्यक्रमाला हजर राहत नाहीत. जामखेड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत कलह मोठा आहे. आमदार रोहित पवार यांच्या जवळ कानफुगवे असल्याने रोहित पवार यांनी अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येत आहे.

कार्यकर्त्यांना दुय्यम वागणूक देत असल्याचे कार्यकर्ते सांगतात. तालुक्यातील अनेक विकास कामात कार्यकर्त्यांना लांब ठेवून बाहेरील लोकांना जास्त महत्व देणे याबाबी आमदार रोहित पवार यांच्यासाठी अडचणीच्या ठरल्या आहेत. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी भाजपचा रस्ता निवडत आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT