Hiwarkhed Municipal Council : मिटकरी अन्‌ नागरिकांच्या पाठपुराव्याला यश; हिवरखेडला नगरपरिषद होण्याचा मार्ग मोकळा

Gram Panchayat To Municipal Council : भाजप आमदार प्रकाश भारसाकळे यांनी विरोध दर्शविला होता. ग्रामपंचायतच राहावी, अशी त्यांची भूमिका होती.
Hiwarkhed Gram panchayat
Hiwarkhed Gram panchayatSarkarnama

Akola News : अकोला जिल्ह्यातील सर्वात मोठी हिवरखेड ग्रामपंचायतीचे रूपांतर आता नगरपरिषदेत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारकडून लवकरच यासंदर्भात अधिसूचना निघणार असल्याची माहिती आहे. हिवरखेडच्या नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. हिवरखेड नगरपंचायत किंवा नगरपरिषद व्हावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी पाठपुरावा केला होता, तर आमदार प्रकाश भारसाकळे यांनी विरोध दर्शविला होता. ग्रामपंचायतच राहावी, अशी त्यांची भूमिका होती. मात्र, भारसाकळे यांना जनतेच्या संतप्त रोषाला बळी पडावे लागले होते. बॅकफूटवर गेलेल्या भारसाकळे यांनी शेवटी नगरपरिषद होण्यास संमती दर्शविली होती. (Paving the way for Hiwarkhed to become a municipal council)

नगरपरिषद होण्याच्या प्रक्रियेत एकही आक्षेप अथवा हरकत प्राप्त न झाल्याचा अभिप्राय अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी राज्य सरकारला पाठविला आहे. त्यामुळे हिवरखेड नगरपरिषदेच्या निर्मितीमधील सर्व आडकाठ्या दूर झाल्याने गेल्या अनेक वर्षांपासूनची असलेली मागणी पूर्ण होणार आहे. राज्य सरकारकडून कोणत्याही क्षणी हिवरखेड नगरपरिषदेची अंतिम अधिसूचना निघून हिवरखेड ग्रामपंचायत बरखास्त होऊ शकते.

Hiwarkhed Gram panchayat
Maharashtra politics : …अब बारी आयी है! राहुल नार्वेकर रिमोट दाबणार; १६ आमदारांवर कंट्रोल येणार?

अनेक संघटना-लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा

मागील २३ वर्षांपासून हिवरखेडच्या नागरिकांचा नगरपंचायत अथवा नगरपरिषद व्हावी, यासाठी सामूहिक संघर्ष सुरू आहे. राजकीय इच्छाशक्तीअभावी हा विषय आतापर्यंत प्रलंबित राहिलेला होता. मागील अनेक वर्षांपासून अनेक सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, उपोषणकर्ते, आंदोलनकर्ते, हिवरखेड विकास मंच, लोकजागर मंच, जागरूक आणि विकासप्रेमी नागरिक, विविध लोकप्रतिनिधी, विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते, संबंधित अधिकारी व कर्मचारी आणि विविध संघटनांनी निरंतर पाठपुरावा सुरू ठेवला. आता अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचे नगरपरिषदेसाठी आक्षेप हरकत नसल्याबाबतचे आणि हिवरखेड नगरपरिषद करावी, असे अभिप्राय पत्र अखेर नगर विकास मंत्रालयात धडकले. आता सरकारच्या अंतिम अधिसूचनेकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

मिटकरींचा पाठपुरावा अन्‌ भाजप आमदारांचा विरोध

हिवरखेडला नागरी क्षेत्र घोषित करण्याबाबत विधान परिषदेचे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी विधिमंडळात वारंवार हा प्रश्न मांडला. ज्या दिवशी आमदार मिटकरी यांनी हा प्रश्न विधिमंडळात पुन्हा उचलला होता, त्याच दिवशी मुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हिवरखेड नगरपरिषदेची प्राथमिक घोषणा केली होती. त्यानंतर नगरपरिषद होण्याबाबत एक महिन्याच्या आत आक्षेप व हरकती मागविण्यात आल्या होत्या. त्यावर एकही आक्षेप किंवा हरकत आलेली नाही.

Hiwarkhed Gram panchayat
Ajit pawar Big Statement : अजितदादांचे मोठे विधान; 'माझ्याकडं आज अर्थखातं, पुढे टिकेल की नाही, माहिती नाही...'

दरम्यान, नगरपंचायतीची प्राथमिक उद्‌घोषणा झाल्यानंतर २२ जणांनी आक्षेप हरकती दाखल केल्या होत्या. सोबतच आमदार प्रकाश भारसाकळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत हिवरखेड नगरपंचायत झाल्यास गावचा विकास खुंटेल आणि लोकांची उपासमार होईल, असे अजब गजब तर्कवितर्क देत हिवरखेड नगरपंचायतीवर स्थगिती आणली होती, त्यामुळे नागरिकांमध्ये मात्र संतापाची लाट उसळली होती. त्यांची चांगलीच नाचक्की झाली होती.

Hiwarkhed Gram panchayat
MLA Rajesh Patil Audio Clip Viral : दीड वर्षापूर्वीची क्लिप व्हायरल करून राष्ट्रवादी आमदाराला अडचणीत आणण्याचा डाव कोणाचा?

हिवरखेडमधील नागरिकांच्या भावना पाहून आमदार भारसाकळे यांनी नगरपंचायतीऐवजी नगरपरिषद करतो, असे सांगितले होते. सर्वसामान्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हिवरखेड नगरपरिषद करण्याबाबतचे पत्र दिले होते.

Hiwarkhed Gram panchayat
Ram Shinde Secret Explosion : रोहित पवारांनी २०१९ मध्ये चंद्रकांतदादांना भेटून हडपसरमधून भाजपचे तिकिट मागितले होते; राम शिंदेंचा गौप्यस्फोट

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com